आमिर खान, एर्दोगन आणि उम्माह

15 ऑगस्ट ला आमिर खान चा, तुर्की च्या राष्ट्रपती,रेसेप तय्यब एर्दोगन,ह्यांच्या पत्नी, एमीन एर्दोगन ह्यांना भेटताना चे फोटो बाहेर आले आणि भारतात एकच गदारोळ झाला. सामान्य भारतीय माणसाच्या मनात ह्या भेटी विषयी किती संताप आहे हे Social Media मधून बाहेर यायला लागले. खरं म्हणजे आमिर खान, त्याच्या लाल सिंग चड्ढा, ह्या सिनेमाच्या शूटिंग करता तुर्की इथे गेला होता. त्यामुळे तसे बघितल्यास  जनते मधला हा प्रक्षोभ अकारण वाटेल. पण आपण जर मागच्या काही वर्षातला घटना क्रम बघितला तर गोष्टी इतक्या सरळ सोप्या नाहीत हे लक्षात येईल. 

या शूटिंग प्रकरणा नंतर, मला पडलेले काही प्रश्न असे. आमिर, लाल सिंग चे शूटिंग लडाख मध्ये करणार होता. मग ऐनवेळी हा निर्णय का बदलला? ह्या कॉरोनच्या काळात, आमिर खान ला सिनेमाच्या शूटिंग करता तुर्की ला का जायचे होते? त्याला भारत सरकारनी परवानगी का दिली? बरं,तो आता परत आल्यावर नियमा प्रमाणे १४ दिवस quarantine होणार का? का सिनेमाच्या प्रसिद्धी करता आजी-माजी मंत्र्या बरोबर एमीन इरोडगान सारखे फोटो काढत फिरणार? 

ह्याही पेक्षा काही महत्वाचे मुद्दे असे. मागच्या काही वर्षात,तुर्की  हा देश उघड पणे भारताच्या वीरोधात उभा ठाकलेला आहे. अध्यक्ष एर्दोगन, ह्यांनी भारताच्या अंतर्गत बाबीं मध्ये ढवळा ढवळ करायला सुरुवात केली आहे. अनुच्छेद 370 चे उच्चाटन असो, राम मंदिर असो वा दिल्ली दंगे असो, तुर्की नि भारताला वेळो-वेळी भारताला अपमानीतच केले आहे. 

ह्या भाजप सरकारनी जेंव्हा अनुच्छेद 370 चे उच्चाटन केले, तेंव्हा फक्त तीन देशांनी ह्या विरुद्ध आवाज उठवला. ते म्हणजे,अर्थात पाकिस्तान,चीन आणि तुर्की. एर्दोगन, ह्यांनी २४ सप्टेंबर २०१९ ला संयुक्त राष्ट्र, इथे बोलताना, काश्मीर मुद्दा उकरून काढला. त्यावर बोलताना ते म्हणाले, काश्मीरातील जनतेवर (मुसलमान) मागची ७२ वर्षे अन्याय केला आहे. (कश्मिरातल्या मुसलमानांनी 1992 मध्ये 3 लाख पंडितांना बाहेर काढले ह्या विषयी ऐक शब्दहि नाही) त्या नन्तर, फ़ेब्रुवारी २०२० मध्ये, एर्दोगन ह्यांनी पाकिस्तान असेम्ब्ली मध्ये बोलताना, कश्मिरी लोकांचा लढा (भारतीयां विरूद्धचा) आणि WWI मधील Ottoman साम्राज्य च्या लढ़ा हा सारखाच असल्याचं सांगितलं. म्हणजे काय? तर जगातील सगळे मुसलमान ऐकच आहे (Ummah) आणि जसे एकेकाळी Ottoman साम्राज्य होते तसे बलाढ्य इस्लमाईक साम्राज्य परत एकदा येणार.

एवढ्यानी झाले नाही. एर्दोगन ह्यांची पार्टी AKP,हि जमात-ए-इस्लामी आणि Arakan Rohingya Salvation Army (ARSA) ह्या कट्टरपंथी संघटनांना आर्थिक मदत करत असते.  ह्याच्या जोडीला एर्दोगन, ह्यांनी भारताच्या अणू चाचण्यांचा विरोध केला आहे आणि ते Organisation of Islamic Cooperation,इथे पकिस्तान बरोबर बाबरी मस्जिदिचा मुद्दा उकरून काढत असतात. 

थोद्क्यात काय तर, तुर्की हे काही भारताचे मित्र राष्ट्र नाही .एवढंच काय,पण ते ऐक कट्टरवादी मुस्लिम राष्ट्र बनण्याचा मार्गावर आहे. मग मुद्दा असा कि तुर्की भारताच्या विरुद्ध आणि पाकिस्तानच्या बाजूने उभा असूनही आमिर खान तिथे का गेला? ग्यानबाची मेख इथेच आहे. आमिर जरी वर-वरून स्वतःला आधुनिक म्हणून प्रदर्शीत करत असला तरी, तो खरा-खुरा कट्टर मुसलमान आहे. तो एक जुन्या,बुरसटलेल्या विचारांचा प्रणेता आहे. विश्वास बसत नाही ना? त्याच्या काही  कारनाम्यांची सूची पहा.

  1. मंगल पांडे, ह्या ब्राह्मण पोलीसानी, चामड्याच्या गोळ्या दातांनी चावण्यास नकार दिला आणि एका प्रकारे तो 1857 च्या पहिल्या स्वंतंत्रता यूद्धा चा आग्रणी सेनापती होता. त्याला आमिर नी, स्वतःच्या चित्रपटात वेश्यागमन करताना दाखवीले आहे. 
  2. दंगल या प्रसिध चित्रपटात, आमिरनि फोगाट बहिणींना मांसाहारी भोजन करताना दाखविले आहे. जेव्हाकि त्या शाकाहारी आहेत. 
  3. PK ह्या चित्रपटात, आमिरनि उघड उघड हिंदू देवतांची आणि हिंदू मान्यतांची खिल्ली उडवली आहे.
  4. 2015 मध्ये (मोदी निवडून आल्यावर १ वर्षांनी ),आमिर आणि त्याची पत्नी किरण किरण राव, ह्यांना lynchings मुळे भारता मध्ये आशिषणुता वाढली असून,हा देश सोडून द्यायला पाहिजे असे वाटत होते. 

आता गम्मत पहा, इतक्या संवेदनशील खान दाम्पत्याला, कमलेश तिवारी हत्या, बंगलोर मधल्या दलित काँग्रेस MLA श्रीनिवास मूर्थी ह्यांचा घरा वरचा हल्ला,आया (hagia) सोफीया चे, मस्जिदी मध्ये रूपांतर, आणि असल्या कित्येक महत्वाच्या मुद्द्यान विषयी तोंडातून ऐक शब्दही काढावासा वाटत नाही. ह्याचे खरे कारण हेच आहे कि खान असो वा अख्तर…वरून कितीही आधुनिकतेचा बुरखा पांघरला तरीही,आतुन हे सगळे कट्टरवादाचे पुरुस्कर्तेच आहेत. त्याला कारणं हि तशीच आहेत. इस्लामचा धिक्कार करा आणि उदारमतवादी म्हणून मिरवा अशी, योजना इसलाम मध्ये नाही. सलमान रश्दी, स्टॅनिक व्हर्सेस लिहल्यानंतर ३ दशकं जीव वाचवत फिरत होता. 

हिंदू, ह्याच्या विरुद्ध वागतात. आमिर खान, किंव्हा कोणी आझमी किंव्हा हिंदू कलाकार सुद्धा, जितका ह्या देशाचा, इथल्या संस्कृतीचा,आम्हला प्रिय असलेल्या प्रतीकांचा, जितका अपमान करतील तितका त्यांना मान – मरातब मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. दिल्ली ला बोलावून पदमश्री  देण्यात येईल . कदाचित काही राजनैतिक पक्ष निवडणूक ची तिकीट पण देतील. कारण हिंदूंना उदारमतवादी म्हणऊन घेण्यात गर्व वाटतो. धर्माचा,देशाचा सन्मान कितीही तुडवला गेला तरी चालेल. 

बाकी आमची भाजप आहे, तेव्हढा तरी हिंदूंना आधार आहे . पण ऐक विचित्र घटना गोष्ट,आठवली… आमचे लाडके CM, ज्यांच्या नावाचं इंद्र आहे, ते ह्याचं खाना बरोबर ‘पाणी पाणी’ करत का फिरले  होते हे अजून कळलं नाही. 

 

Ajay Sudame

Editor - Indic Vichaar. Conservative, Nationalist, For Free Markets, Global Warming Denier. Engaged is Sales and Sales Management for living.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *