नवा अफगाणिस्थान – भारतापुढील ऑप्शन – हा दाव सफल होईल काय?
भारताला व भारतीयांना अफघाण लोकांबद्दल सुरवतीपासून एक सॉफ़्ट कॉर्नर आहे. तसाच तो अफघाण लोकांच्याही मनात आहे. आजतागयत भारताने अफ़गाणिस्थानात प्रचंड पैसा ओतलेला आहे. खूप सुधारणा केलेली आहे. कराराप्रमाणे परदेशी फ़ौजा परत जातच आहेत. नाटोचे सैन्य, साधारण पणे, एका वर्षाच्या आत, पूर्णपणे परत जातील. त्या नंतर त्यांचा रोल हा ट्रेनिंग देणं व फ़क्त इमर्जन्सिला प्रत्यक्ष कृती करणं इतकाच असणार आहे. तालिबानी अतिरेक्यांच्या कारवाया सुरुच आहेत. नाटोचे सैन्य परत गेल्यावर ह्या कारवाया प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत.
ज्या लहान मुलांना अफ़गाणिस्तानातल्या अराजकाची, तीथे होणार्या हत्यांची झळ पोचली आहे. तीच मुलं आता सज्ञान झालेली आहेत. ही मुलं नवा अफगाणिस्थान घडवणार आहेत का ? का जुना जुलुम तसाच परत सुरु होईल ? अफ़गाणिस्थानात स्थिर सरकार येणं हे भारताच्या हिताचं आहे. असं मला वाटतं . आजतगायत जशी भारताने अफ़गाणिस्थानला मदत केली तशीच ती पुढेही करावी असं वाटतय . पण ते शक्य आहे का? निव्वळ कॉमन-सेन्स वरून काही मते पुढे मांडत आहे.
केलेल्या गुंतवणुकी पर्यंत जायचा रस्ता जोवर सुकर नाही, तोवर केलेली गुंतवणूक ही जुगार असते. वेगाने वाहणाऱ्या नदीच्या मधोमध जर मला २० एकर सुंदर-अप्रतिम जमीन मिळाली (एक बेट) आणि त्या बेटात मी पैसे गुंतवले तर मला फायदा होईल का? जोवर मी तिथे पोहोचायला बोट घेत नाही (पण वेगाने वाहणाऱ्या नदीत होडी कितीशी उपयोगी?) किंवा एक स्थायी पूल बांधत नाही, तोवर ती गुंतवणूक बुडीत खात्यात धरावी.
अफगाणिस्थान आणि भारत तसेच काहीसे आहे. जोवर पाकिस्तानास आपण संपवत नाही, तोवर अफगाणिस्थान मधील गुंतवणूक पाक किंवा इराण च्या भरोश्यावर असार आहे.
तिथंवर पोहोचायचा राजमार्ग म्हणजे लाहोर- पिंडी -अटक- पेशावर – काबूल.
दुसरा मार्ग म्हणजे ग्वादर-क्वेट्टा- बोलन खिंडीतून कंदाहार – काबूल.
तिसरा मार्ग म्हणजे चाहबहार देलाराम – कंदाहार-काबूल हा इराण मधला मार्ग (हा हायवे भारताने बांधला आहे).
चौथा मार्ग म्हणजे जम्मू-उरी-पूंच-मुझफ्फराबाद-स्वात-काबूल.
पाचवा मार्ग म्हणजे जम्मू-श्रीनगर-कारगिल-गील्गीत-वाखान-काबूल.
आता या पाच पैकी ४ आणि ५ हे दुर्गम ठिकाण (हिमालय) असल्यामुळे तिथून मार्ग बनवणे आणि तो टिकवणे कठीण आणि खर्चिक. अधिक मार्ग ४ आणि ५ सिद्ध व्हायला पाकव्याप्त काश्मिर जिंकावा लागेल. उरले पहिले तीन पर्याय.
मार्ग १ हा सर्वार्थाने सोपा आणि फायदेशीर मार्ग आहे. पण त्यासाठी पाकव्याप्त -पंजाब जिंकून (किंवा अनुकूल करून) अंकित करावा लागेल. हे व्हायला पाक सेना आणि तिथले मुल्ला-मदरसे- जिहादी नेटवर्क पूर्णपणे संपवावे लागेल. आणि तो भूभाग २०-३० वर्षे धरून ठेऊन जमल्यास तिथल्या जनतेचे शीख-हिंदू पंथांमध्ये मतांतरण करावे लागेल. मोठी इन्व्हेस्टमेंट आहे पण हीचे फायदे खूप दूरगामी आणि मोठे असतील. अर्थशास्त्रात याला “rich dividends” मिळवून देणारा ऑप्शन म्हणता येईल.
दुसरा मार्ग हाती यावयास बलुचीस्तान जिंकावा किंवा अंकित करून अनुकूल करावा लागेल. इथे गुंतवणूक (पंजाब च्या तुलनेने) कमी आहे पण चीनशी उघड सामना संभवतो आणि मध्ये सिंध असल्यामुळे भारत-बलुचिस्तान logistics सांभाळणे कठीण होईल. तरी श्रेयस्कर मार्ग. हे व्हायला देखील पाक सेनेचा पूर्ण विनाश आवश्यक आहे, पण पंजाब धरून ठेवण्यात येणारा खर्च इथे कमी असेल. तुलनेने बलुचिस्तान आणि बलुची लोक भारतास अनुकूल आहेत.
तिसऱ्या मार्गाची वाजपेयींनी निवड केलेली आहे. इराणचे चाहबहार बंदर आणि इथून कंदाहार पर्यंत मोठा राजमार्ग भारताने बांधून तयार केलेला आहे. पण मनमोहनसिंह यांच्या कारकिर्दीत इराण नीती होय होय-नाय नाय अशी राहिल्या मुळे इराण-भारत संबंध दुरावले आहेत. त्यामुळे ही गुंतवणूक कधी फलदायी ठरेल हे सांगणे कठीण आहे. अधिक इराण काही पाकिस्तान नाही, ती एक प्राचीन आणि स्वायत्त संस्कृती आहे. ती आपल्या मर्जीवर आपल्याशी वागेल आणि रशियाला अनुकूल घेऊन वागावे लागेल.
अफगाणिस्थान हा “अहिगणस्थान” आणि “गांधार” आहे आणि होता. तो हातचा जाऊ देणे मूर्खपणा आहे हे शास्त्र सांगते. पण तिथवर पोहोचायचा मार्ग ताब्यात नसल्या कारणाने एका मर्यादे पलीकडे ही चर्चा निव्वळ पुस्तकी ठरते.
कसे आहे की , तुम्हाला पोरगी हवी आहे, पोरीला पण तुम्ही हवे आहात पण तिच्या पर्यंत पोहोचता येत नसेल तर काय फायदा या मोहोब्बतीचा? पोरगी गुपचूप येईल त्या नवऱ्यासोबत नांदू लागेल. तो नवरा या वेळेस चीन असेल. या विवाहात चडफडत बसण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही.
उपाय : कॉस्ट-बेनेफिट स्टडी
वरील पाच मार्ग या समस्येवरील उपाय आहेत. प्रत्येक निर्णयाची एक किंमत असते, एक किंवा अनेक फायदे असतात, आणि एक किंवा अनेक साईड-इफेक्ट असतात. प्रत्येक निर्णय मोजावी लागणारी किंमत आणि मिळणारा फायदा यावर घ्यावा लागतो.
वरील पाच मार्ग हे पाच पर्याय आहेत. पाचही पर्यायांची काही किंमत आहे, आणि काही फायदे आहेत. पंजाब जिंकणे , ताब्यात ठेवणे आणि लोकसंख्येला परत हिंदू करून घेणे (क्रमशः) हा खूप महाग पर्याय आहे. पण जर ती किंमत मोजायची तयारी भारताची असेल तर भारत ती नक्कीच मोजेल.
यातील सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग (मार्ग क्रमांक तीन – इराण मार्गे अफगाणिस्थान) भारताने ऑलरेडी निवडलेला आहे. इथे किंमत कमी आहे आणि फायदा देखील कमी आहे. मार्ग क्रमांक १ मध्ये किंमत अधिक आहे आणि फायदा खूप अधिक आहे. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक जण आणि देश आपापले निर्णय घेत असतो. आणि आज एक निर्णय घेतला म्हणजे भविष्यात इतर मार्ग निवडणार नाही, असे होत नाही. सोयीनुसार देशांच्या नीती बदलतात.
माझ्या मते काश्मीर आणि गील्गीत जिंकून त्या मार्गे अफगाणिस्थान पर्यंत पोहोचणे खूप अधिक खर्चिक आहे कारण भूगोल बिकट आहे. पंजाबचा मार्ग तुला वाटतो तितका महाग नाही (आहे, पण काश्मीर-मार्गे अफगाणिस्थान हा सर्वात महाग मार्ग असेल). जर चोख तयारी करून, योग्य वेळ निवडून आपल्या सोयीनुसार आणि पाकिस्तान च्या पूर्ण गैरसोयीनुसार निकराची लढाई केली तर पंजाब खूप सहज पडेल.
पंजाबच्या सपाट भूमीवर आक्रमण करणे खूप सोपे आहे. काश्मीर-गील्गीत मध्ये हेच आक्रमण खूप वेळखाऊ आणि महाग पडेल. कारगिलची लढाई म्हणूनच महागात पडली. १९६५ मध्ये तिथे लढायच्या भानगडीत आपण पडलोच नाही, सरळ लाहोर वर आक्रमण केले आणि २ दिवसात लाहोरची उपनगरे आपल्या ताब्यात आली. तीच लढाई अजून आठवडा-दीड आठवडाभर चालली असती तर मुलतान, हैदराबाद, कराची, आणि पिंडी च्या आसपास सेना पोहोचली असती. काश्मीर-गील्गीत भाग निर्मनुष्य असताना जिंकायला २-३ महिने लागतील. लढता-लढता ६/७ महिने, ते देखील खूप रक्त सांडून आणि पैसा खर्चून.
खरी ट्रिक पंजाब धरून ठेवणे ही आहे. ते देखील सलग २०-३० वर्षे, कडक अंमलाखाली. जवळपास आणीबाणी सदृश परिस्थितीत. तेव्हा २०-३० वर्षांच्या नंतरची पिढीच्या मनातला विखार कमी होऊन ती पिढी इतर भारतीयांशी मिसळायच्या लायकीची होईल. होल्डिंग टाईम खूप अधिक आहे, मोठी गुंतवणूक आहे ती. पण जर फळास आली तर खूप मोठा आणि स्थायी फायदा होईल. धंदा म्हंटले की चढणे आले आणि बुडणे देखील आले. आणि युद्ध हा राजकारणाचा एक भाग आहे आणि राजकारण व्यापारावर चालते. जेव्हा हा पर्याय निवडून होणारा नफा या गुंतवणुकीहून कैक पटीने अधिक आहे हे भारताला पटेल आणि तितके सामर्थ्य वाढेल, हा निर्णय भारत एका पायावर घेईल.
मराठे पंजाबात का गेले?
तो मुलुख जर २/३ वर्षे धरून ठेवला असता तर कोट्यावधीचा महसूल मिळाला असता. पंजाब १९ महिने मराठ्यांनी राखला सुद्धा. अब्दाली हरला असता तर मराठ्यांची return of investment लगेच सुरु झाली असती. तीच गोष्ट इथे पण.
मराठे जिंकले आणि वाढले कारण त्यांचे military-industrial complex बळकट होते. आजच्या अमेरिकेसारखे. उसने पैसे वर युद्ध करायचे, सेना उभारायची, मोहीम करायची आणि जिंकल्यावर ज्याने मोहिमेला फायनान्स केले त्याला नफ्याचा वाटा द्यायचा – अमेरिकेचे हेच आजचे मॉडेल आहे. हे मॉडेल सेनेच्या आणि पुणे-दरबार च्या विश्वासार्हतेवर चालायचे. विचार करा ज्या सावकारांनी राघोबाला इतक्या दूरवरच्या मोहिमेला फायनान्स करायचे ठरवले आणि ३-४ वर्षे गुंतवणूक परत मिळणार नाही हे माहिती असताना देखील गुंतवणूक केली, तर मराठी सेनेची विश्वासार्हता किती असेल, ते विचार करा. .
तशी विश्वासार्हता जेव्हा भारतीय सेनेची बनेल, मार्ग-१ लगेच उपलब्ध होईल.
भारत मराठ्यांकडून शिकत नाही. स्वतःला इंग्रजांचा आणि मोगलांचा उत्तराधिकारी म्हणवतो पण इस्ट-इंडिया-कंपनी देखील अशीच वाढली, हे लक्षात घेत नाही. मोगल लुटीवर वाढले. पण मराठे आणि इंग्रज याच मिलिटरी-फायनान्स कॉम्लेक्स वर वाढले. भारताला वाढायचे असेल तर ही वृत्ती आणि हे स्वदेशी मिलिटरी-इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स निर्माण करून ते वाढवावे आणि जतन करावे लागेल.