गांधी वंशावळ,सीडब्ल्यूसी बैठक आणि जैसे थे

23 ऑगस्ट ला सीडब्ल्यूसीची (काँग्रेस वर्किंग कमिटी) बैठक अखेरीस झाली. आणि काहीही निर्णय न होताचं उरकली! २३ असंतुष्ट नेत्यांनी लिहिलेल्या पत्रा संबधित ही डिजिटल बैठक बोलविण्यात आली होती. त्यांना एक ‘पूर्णवेळ काम करणारा, प्रभावी आणि लोकाना दिसेल’ असा पक्षाधक्ष्य हवा होता. आता, ही मागणी योग्यचं आहे.  पण हा राहुल गांधीं वर केलेला थेट आरोप आहे! गांधी वंशाच्या दिव्या विरुद्ध केलेले अविश्वासाचे हे कठोर विधान आहे. जे की सोनिया कॉंग्रेस साठी एक अप्रुप आहे. 23 नेत्यांनी  तो ‘लेटर बॉम्ब’,24 अकबर रोड वर फेकल्या पासून आणि एवढ्या प्रचण्ड मोर्चा बान्धणी नंतर बंड होणार हे नक्की होतं! ही बैठक तब्बल 7 तास चालली. आणि, दोन्ही बाजूं एकामेकाल्या भरपूर सुनावले. जे,काॅग्रेस पार्टी करता अजून एक अप्रुप आहे. परंतु तब्बल 7 तासाची चर्चा, विचारविनिमय आणि आरोपां नंतर परत जैसे थे . काहीही बदलले नाही! 

सोनिया गांधी ह्या  पक्षाध्यक्षपदी कायम आहेत. त्यांचा वारसदार, राहुल गांधी पदभार स्वीकारण्यासाठी विन्गे मधे सज्ज आहे. आणि असंतुष्ट नेत्ते हात चोळत बसले आहेत. ह्या मिटिंग च्या दुसर्या  दिवशी, कॉंग्रेसचे आणखी एक नेते, अनिल शास्त्री, असंतुष्टां मध्ये सामील झाले. पण त्यानी काहीही फरक पडत नाही. गांधीं कुटुंबीयांनी आपसात मिळून,यशस्वीरित्या,अजून एकदा, अत्यंत शिताफीने  त्यांना नेतृत्वाच्या पदा वरून दूर करण्याचा आणखी एक प्रयत्न केलेला हाणून पाडला होता. 

आपणही जरका हाच विचार करत असाल,तर मी  आपल्याला दोष देणार नाही. कारण हीच  प्रतिक्रिया आहे, बहुतेक राजकीय निरीक्षक देत आहेत. आणि हे असेच होणार असे अपेक्षित होते. त्यामुळे विश्लेषकही त्या २३ नेत्यांची खिल्ली उडवत आहेत आणि हे गांधींचा आणखी एक विजय म्हणून घोषित करत आहेत. परंतु मला वाटते की या वेळी हे बंड गांधींनी गंभीरपणे घेण्याची गरज आहे. 

मी असे का म्हणतो हे पत्र लिहीण्याच्या  23 जणांच्या यादी वर नजर टाकली तर लक्षात येईल. ह्यात, गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आणि तरुण तुर्क यांचे मिश्रण आहे. त्यामुळे,जुन्या (टीम सोनिया) विरूद्ध युवा (टीम राहुल) ह्यांच्यात वितुष्ट आहे हा सिद्धांत खोटा.  त्यापैकी गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, आनंद शर्मा आणि जितिन प्रसाद हे गांधींचे  निष्ठावंत आणि स्वत: सीडब्ल्यूसी सदस्य आहेत.  जे की त्यांचा काँग्रेस पार्टी मधील वचक आणि गांधीं कटुंबाशी जवळीक दर्शविते. ह्यांच्यापैकी काहींनी, मोदींच्या उदया पासून निवडणूक जिंकलेली नाही. अंबिका सोनी ह्यांनी,एकाला या धर्तीवर टोमणे पण मारले. आणि तरीही त्यांना पार्टीने विशेषाधिकार दिले आहेत. तर ह्यातले काही लोक लोकप्रिय नेते आणि निवडून आलेले खासदार आहेत. आणि राहुलने पडद्या मागून  पक्ष नियंत्रित करण्या विरुद्ध नाराजी व्यक्त करत आहेत. या यादीतील काहीजण तर तुम्हाला-कोठे-तरी-पहिले-आहे अशातले आहेत. मग अशा विरोधा भास असण्याऱ्या व्यक्तीं एकत्र का?

कारण या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. किंवा अधिक योग्य, एक समान शत्रू आहे. आणि तो म्हणजे राहुल गांधी! कॉंग्रेसमधील त्यांची सध्यस्तिथी ही राहुल मुळे धोक्यात आहे. ह्याचे कारण? एकतर तो त्यांना बाहेर काढू इच्छितो किंवा त्याची असमर्थता. हे आता काही रहस्य नाही, की राहुल जुन्या निष्ठावंता मुळे  निराश आहे आणि त्यांच्या जागी स्वतःची टीम नेमू इच्छित आहे. ज्योतिरादित्य सिंधिया भाजप मध्ये जाणे आणि सचिन पायलट ही जवळ जवळ तेच अनुसरणे ही त्या निराशेचे स्पष्ट उदाहरणे आहेत . दुसर्‍या दिवशी, 24 ला अगदी प्रियंका वड्रा, यांनीही राहुल गांधींची री, न ओढ़ल्या बद्दल निष्ठावंतांवर रोष व्यक्त केला. थोडक्यात काय, सिब्बल म्हणा किंवा आनंद शर्मा म्हणा…ह्यांनी बंडखोरी करणे समजू शकते.

परंतु शशी थरूर किंवा जितिन प्रसाद किंवा मनीष तिवारी यांच्या सारख्या व्यक्तीला, ह्या जुन्या निष्ठावंता च्या बरोबर साटं-लोटं करण्याची का गरज भासली? कारण त्यांना खात्री आहे की निवडणुका जिंकण्यासाठी जी कुवत लागते ती राहुल यांच्याकडे नाही. एक काळ असा होता की गांधी कुटुंबियांमुळे  पक्षाला एक गठ्ठा  मते मिळत आणि उमेदवार निवडणुका जिंकत. ते दिवस आता सरले. गांधी, म्ह्णून कोंग्रस ला वोट देण्यार्यान्ची संख्या घटत चालली. हे या,वयस्क व तरुण असंतुष्टांना चांगलेच ठाउक आहे.त्यांना ही पण खात्री  आहे,की राहुल पुन्हा जर अध्यक्ष झाला तर आपली राजकीय कारकीर्द नक्की संपुष्टात येणार आहे.

आता बण्ड तर करून झाले! गांधी कूटुंबा शी उघड़ पणे शत्रुत्व पत्करले. हाती काय आलं? शून्य? मला असं वाटत नाही. सगळी जुनी-नवी, यशस्वी-अपयशी नेते एकत्र आल्या मुळे ६ महिने का होईना, राहुल बाबा चा राज्याभिषक थांबला. आता, कदाचित जितिन प्रसाद सारख्याला उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसमध्ये निर्णय घेण्याची मुभा असेल. श्रीमती वाड्रा,कधी फोटो साठी helicopter मधून खाली उतरतील आणि सुचना देतील ह्याची वाट पाहायची गरज पडणार नाही. आता अशी शक्यता आहे की, मिलिंद देवरान सारख्या समंजस माणसाला पक्षाच्या आर्थिक धोरणांची घोषणा करण्यापूर्वी ऐकले जाईल. आता थरूर सारख्या एखाद्या व्यक्तीसाठी, जो सलग तीन वेळा त्रिवेंद्रमकडून जिंकून आला आहे आणि जो उदारमतवादी वर्तुळातही खूप लोकप्रिय आहे, त्याला अंतर्गत निवडणुका मध्ये उभे राहू दिले जाईल. आणि जर तसे झाले तर अशी शक्यता आहे की तो नेता पक्षाध्य बनू पण शकेल. 

पण हे सगळे कॉंग्रेस सारख्या चमच्यागिरी साठी प्रसिद्ध असलेल्या आणि High Command संस्कृतीत अडकलेल्या पक्षात शक्य आहे असे वाटते? वास्तविक होय. मोठी शक्यता हीच आहे की असंतुष्टांचे पंख निर्दयतेने कापले जातील आणि माय-लेकरं बंड पुसण्या साठी सर्व शक्ती वापरेल. पण ह्या वेळी हा विद्रोह शमवणं इतके सोपे आहे असे वाटत नाही. आणि असंतुष्टांना  ह्या वेळी  न्याय- निवाडा नाही दिला गेला,  तर 1969 ची पुनरावृत्ति होईल!! त्यावेली जसे Mrs गांधींच्या हाती जसा दुभन्गलेला पक्ष आला, तीच परिस्थिती ह्या Mrs गांधीना ही पाहायला मिळेल. 

Ajay Sudame

Editor - Indic Vichaar. Conservative, Nationalist, For Free Markets, Global Warming Denier. Engaged is Sales and Sales Management for living.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *