NEP 2020 PART – 2
मागील भागात आपण पाहिले की न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत शाळांचे पालटलेले रूप कसे असणार आहे.
बदललेला अभ्यासक्रम :
मुलांच्या सर्वांगीण विकास कसा घडेल ह्यासाठी बांधील असणार आहे. पाठांतर, घोकम पट्टी न करता मुले कशी प्रात्यक्षिके करून, प्रोजेक्ट्स करून सायन्स , इतिहास ,भूगोल ह्या विषयात रुची निर्माण करतील ह्याकडे कल असणार आहे.
त्यासाठी नवा अभ्यासक्रम, नवी टीचिंग टेकनॉलॉजी, नवी परीक्षा पद्धती असणार आहे. आता ह्यांच एक उदाहरण घ्या. आतापर्यंत परीक्षा कशा घ्यायच्या ते समज. तुम्ही हॉटेलात गेलात, सूप ऑर्डर केले. वेटर ने ते आणले १५,२० मिनिटात . तुम्ही ते प्यायलात आणि लक्षात आले तुमच्या की टेस्ट काही ठीक नाहीये. मग काय .वेटर ला कमी मार्क्स परीक्षेत पण आहे ते सूप ठीक करणे शक्य नसल्याने दुसऱ्यांदा सूप बनविणे वेटरने. म्हणजे अगदी तसेच की विद्यार्थी पहिल्या परीक्षेत नापास झाल्यास त्याला पुढच्या वर्षी पेपर द्यावा लागणे. हे होत असे आतापर्यंत. पण न्यू एजुकेशन पॉलीसी प्रमाणे विद्यार्थ्यांचे निरीक्षण सूप बनवण्याची प्रोसेस सुरु असतानाच होणार आता , त्यामुळे विद्यार्थ्यांकडून सूप बिघडण्याचा प्रश्नच येणार नाही , त्याला एक वर्ष वाट बघून परत पेपर द्यावा लागणार नाही तर लगेच सुधारणा करता येणार सूप मध्ये. अर्थात विद्यार्थ्याला कन्टीन्युअसली असेस केले जाणार आता. त्यामुळे “नापास” असा टॅग लागणार नाही व मुलांचा कॉन्फिडन्स वाढेल. निगेटिव्हिटी, प्रेशर, डीप्रेशन मुलांना येणार नाही.
आता बघू या कॉलेज पातळीवर नवीन पॉलीसी अंतर्गत काय बदल अपेक्षित आहेत:
- आता १२वी नंतर,४ इयर मल्टिडिसिप्लिनरी बॅचलर प्रोग्रॅम असणार आता १२वी नंतर
- एम.फील कोर्स रद्द
- एजुकेशन संस्थांना मास्टर्स प्रोग्राम साठी विविध डिझाइन उपलब्ध करून देण्याचे स्वातंत्र्य .
- नॅशनल रिसर्च फौंडेशन ची उभारणी .
- बी.एड कोर्स आता ४ वर्षांचा ( शिक्षक प्रोफेशन करिता )
- टॉप रँकिंग असणाऱ्या ग्लोबल युनिव्हर्सिटीज आता भारतामधील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतील.
- डीग्री कॉलेजेसना डीमड युनिव्हरसिटीचे स्टेटस मिळणार. विद्यापीठाशी असलेले कॉलेजेसचे ऍफिलेशन संपुष्टात येणार .
- कला, सायन्स, वाणिज्य शाखा असलेली कॉलेजेस टेकनिकल कॉलेजेस म्हणजेच इंजिनीरिंग, इत्यादी सामायिकपणे एका परिसरात उभारली जातील.कारण विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे विषय निवड करू शकणार.
ह्या सगळ्यात गम्मत अशी आहे की कागदावर तरी वाचून खूप छान वाटतंय . म्हणजे सर्वांगीण विकास इत्यादी.पण इंजिनीरिंग चे विषय शिकणारा विद्यार्थी फॅशन डिझांयनिंग पण करु शकणार ही कल्पना न रुचणारी आहे. शंका अशी येतेय की विद्यार्थी दिशाभूल तर होणार नाहीत ना? “आधी हे करून बघतो नाहीतर मल्टीपल एक्सिट आणि मल्टीपल एन्ट्री चा परवाना असल्याने नाही जमले तर ते करू.“ ही वृत्ती मुलांना बेजबाबदार बनवू शकते.मला वाटते की मुले गोंधळलेल्या अवस्थेत राहू शकतात अनेक पर्याय उपलब्ध असल्याने. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. तसेच GOAL सेटिंग, हिट द टार्गेट सारखे करिअर प्लँनिंग चे तत्त्व
विस्कळीत होऊ शकते. मराठीत एक म्हण आहे “ एक ना धड भाराभर चिंध्या“ असे होऊ नये.
दुसरे म्हणजे वर्ष वाया जाण्याची भीतीच नसल्याने मुले अतिशय कॅजुअली ह्या शिक्षण प्रक्रियेकडे बघू शकतात.
तसेच स्थानिक व्यावसायिक प्रशिक्षण मुलांना लहानपणीच ( ६ वी ) मिळतेय पण ह्यामुळे स्वतःचा उद्योग सुरु करायला डिग्री हवी कशाला असे विचार उच्च शिक्षण घेण्यापासून परावृत्त करू शकतात. अर्थात पालक , शिक्षक त्यासाठी आहेतच. थोडी भेळ होतेय आहे कॉलेज लेवल वर असा भास होतोय.कदाचित जसा जसा अभ्यासक्रम बनत जाईल तशी तशी स्पष्टता येईल.
आता ह्या सगळ्यात जी मुले सध्याच्या शिक्षण पद्धतीत शिकून तयार झाली आहेत त्यांना सुमारे १० वर्षाने नवीन पिढीला सामोरे जायचे आहे जे NEP2020 अंतर्गत शिकले आहेत. मग ह्या मुलांनी ऑल राऊंड डेव्हलोपमेंट चे , पेर्सोनालिटी व कमूनिकेशन स्किल इमपृव्हमेंट कडे आतापासून लक्ष देणे आवश्यक आहे.
पालकांना साठी व विद्यार्थ्यांसाठी हे एक आव्हान असणार आहे.
जेव्हा एखादा बदल होत असतो तेव्हा तो स्वीकारण्यासाठी आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागते. अनेक जुन्या रूढी, पद्धती बदलताना त्यावेळच्या समाजसुधारकांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले आहे. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, धोंडो केशव कर्वे यांना जेवढा विरोध सहन करावा लागला तसाच काहीसा तात्विक, वैचारिक विरोध NEP २०२० स्वीकारताना होऊ शकतो. मुख्यत्वे पालकांकडून, कारण आज गेली ३५ (१९८६ पासून) वर्षे आपण मुलांना नोकरवर्ग तयार करण्यासाठी शिकवतो आहोत. आजकालचा पालकवर्ग मुलांच्या करिअर निवडीबाबत इतका आग्रही असतो की त्यांची दृष्टी रुंदावण्याची गरज आहे. तेव्हाच ते मुलांसाठी प्लॅन बी चा विचार करू शकतील. तेव्हाच ते मुलांच्या मनात स्वतंत्र उद्योजक बनण्याचे बीज रोवू शकतील, जे ह्या NEP २०२० चे मुख्य उद्देश आहे.