आईचं पत्र हरवलं…
खूप लोकांना आठवत असेल, लहानपणचा एक अतिशय लोकप्रिय खेळ म्हणजे ‘आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’. आपल्या मामा कडे गेलेल्या शाळकरी मुलाला त्याच्या आईचं पत्र आलेलं असतं, आणि त्याची भावंडे ते पत्र लपवत असतात, असा हा खेळ. आपल्या आजच्या लेखात, पण एक आई आहे, एक मुलगा आहे आणि एक पत्र पण आहे. फरक इतकाच आहे, की हे पत्र आईनी लिहलं नसून, आईला आलेलं आहे. आणि ते पत्र मुलांनी अनधिकृत रित्या वाचलं आहे. ते पत्र म्हणजे काँग्रेस च्या २३ असंतुष्ट नेत्यांनी, काँग्रेस मुख्यालयावर फेकलेला लेटर बॉम्ब.
ह्या पत्रात ह्या २३ नेत्यांनी एक ‘पूर्णवेळ काम करणारा, प्रभावी आणि लोकांना दिसेल’ असा पक्षाध्यक्ष हवा अशी मागणी केली होती. ह्या पत्रातून ह्या २३ नेत्यांनी कसा राहुल गांधीं वर सरळ निशाणा साधला आहे आणि ही कशी एक प्रकारे बंडाची सुरुवात आहे हे आपण मागच्या संपादकीयात पहिले. तर तपशीलात ला भाग असा, की हे पत्र,पक्षाधक्ष्य ह्या नात्यांनी सोनिया गांधी ह्यांना लिहिलेलं होतं. पण ते पत्र,काँग्रेस मुख्यालयत हरवलं! आणि राहुलला सापडलं. आणि ह्या लाडावलेल्या, बिघडलेल्या मुलांनी ते पत्र अनाधितीकृत रित्या उघडलं. दुसऱ्या चे पत्र वाचणे ही जगातल्या बेहुतक सगळ्या संस्कृती मध्ये अतिशय असभ्यतेचे मानले आहे. पण,गांधी कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला हे कुठलेही सभ्य लोकांचे नियम लागू आहेत असे दिसत नाही. ह्यावर,काँग्रेस चे वरिष्ठ नेते, पृथ्वीराज चव्हाण, ह्यांनी एका चॅनेलला मुलाखतीत खेद व्यक्त केला. ते म्हणाले, हे पत्र आम्ही पक्षाध्यक्षांना पाठवलं होत. हे राहुल गांधी पर्यंत कोणी पोहोचवलं? हे असे होता कामा नाही. आणि हे असे कसे झाले, ह्याचा शोध लावणे आवश्यक आहे. ह्याचा शोध कधीच लागणार लावला जाणार नाही,हे उघड आहे. खरं म्हणजे तो लावायची काहीच गरज नाही. कारण ते पत्र राहुल पर्यंत कोणी पोहोचवलं हेही उघड आहे.
बरं हे आईचं पत्र वाचून त्यावर राहुलने काय केलं? त्यांनी सरळ आरोप केला, की हे पत्र लिहिणारे नेते भाजप चे हस्तक आहेत. आता, हा आरोप खरोखरचं अन्यायकारक आहे. ज्या नेत्यांवर हा आरोप केला आहे, त्यातले काही तर राहूलचं जेवढं वय आहे, जवळ जवळ तेवढी वर्ष काँग्रेस मध्ये आहेत. कित्येक नेते हे त्यांच्या वडिलांचे सहकारी होते. त्यांनी अतिशय’ वाईट काळात सुद्धा काँग्रेसची साथ सोडली नव्हती. त्यांच्या वर हा आरोप म्हणजे खरचं दुर्देव आहे. राहुल गांधी ह्यांचा कसा तोल सुटत चालला आहे ह्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. कमीतकमी त्यांच्या वयाचं तरी मान राखावा हे ही त्यांना वाटलं नाही. बहुतेक त्यांच्या संस्कारात,दुसऱ्याची पत्र वाचू नाही हे जसे समाविष्ट नाही, तसे मोठ्यांचा मान राखावा हे ही नसावे.
काँग्रेस ची अशी अवस्था का झाली ह्याची खूप कारण आहेत. पण त्यात ह्या भारतीय मूल्यांची पायमल्ली आणि संस्काराचा अपमान हे ही एक आहे. बहुतांशी भारतीयांना उद्दाम पणा, हक्काची भाषा,अभिमान चे प्रदर्शन, ह्या गोष्टी आवडत नाहीत, हे कोणी पत्रकारांनी गांधी लोकांना सांगितलेलं दिसत नाही. आणि राहुल असो वा प्रियांका व स्वतः सोनिया…काँग्रेस पार्टी, ही त्यांची खाजगी मालमत्ता असल्या सारखेच वागत असतात. पण, ह्या नेत्यांना ही गोष्ट आता का टोचू लागली? कारण, सत्ता तर गेलीच, पण आता जागिरी (राज्यसभा सदस्यता इत्यादी) पण जायची वेळ आली. पण आता वेळ निघून गेल्यावर सुचलेल्या शहाणपणाचा काही उपयोग नाही .
राहूल गांधींनी, अयोग्य पद्धीतींनी वागण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यांची वागणूक ही “मालिक का बेटा” ह्याच श्रेणीत मोडते. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांचा ‘Ordinance‘ त्यांनी ह्याच भावनेतून फाडला. आता, ह्यावेळी ‘आईचं पत्र’ सुद्धा ह्याच भावनेतून उघडले. ह्याच पद्धतींनी ते पुढेही वागत राहणार आहेत. कारण त्यांना बाळकडूच, ‘तुझा जन्म राज घराण्यात झाला आहे,त्यामुळे राजा तूच’ हे त्यांच्या मातोश्रीनी दिलेलं आहे. २००४ ते २०१४ मनमोहन सिंग ह्यांना पुढे ठेवून, खुर्ची मागून राज्य चालवण्याचा प्रताप त्यांनी करून दाखवला. आज राहुल, आपल्या आजारी आईला पक्षाध्यक्षाच्या खुर्चीवर बसवून, मागून काँग्रेस पार्टी चालवत आहेत.
२३ नेत्यांची, राहुल ह्यांनी पक्षाध्यक्ष व्हायला काहीच हरकत नाही आहे. त्यांची अपेक्षा राहुल ह्यांनी ह्या जबाबदारी ची जाणीव ठेवून वर्तन ठेवावे एवढीच इच्छा आहे.त्यात हिमंत बिस्वा सरमा सारखे नेते भेटीला आले असताना, ‘पीडी’ ला बिस्कीट खाऊ घालू नाही हि अपेक्षा पण आली. गोव्यात जेंव्हा विश्वजीत राणे, ह्यांनी हाक दिली तेंव्हा वेळेवर हजर राहावे हि पण आहे.
पण, असले काही होईल असे दिसत नाही. इकडे २३ नेते वेग वेगळ्या वाहिन्यांना भेटी देत असताना, ‘माँ-बेटा’, राहुल च्या पसंती च्या नेत्यांना एक- एका पदावर बसवण्याचं काम करत आहेत. २३ बंडखोरांना आणि त्यांच्या सारख्या शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना जर सन्मान जनक वागणुकीची अपेक्षा असेल तर तसले काही होणार नाही. त्याकरता एक तर राहुल शी लढावे लागेल किंव्हा पार्टीतून बाहेर पडावे लागेल. पक्षाध्यक्ष, कोणीही असो, पदांवर कोणीही असोंत, त्यांची पत्र हरवणार! आणि ती ह्या नाठाळ आणि सूडबुद्धीने वागण्याऱ्या मुलाच्या हातात सापडणार. आणि त्यानंतर तेच होईल जे CWC मिटिंग मध्ये झाले.