उद्धवा, अजब तुझे सरकार! कंगनाच्या बहाण्यानी…

९ सप्टेंबरला मुंबईत जे घडलं ते अतिशय लाजिरवाणं होतं. ज्या पद्धतीनी कंगना राणावतच्या पाली हिल,येथील कार्यालयावर  बुलडोझर फिरवण्यात आला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे किती अपरिपक्व राजनेता आणि सूडबुद्धीने वागणारे आहेत हे लक्षात आले. हे एका सामान्य स्त्रीविरुद्ध क्रूर राज्य सत्तेचा वापर केला जात असल्याचे हे कुरूप प्रदर्शन होते! प्रचंड लोकप्रिय असलेली, पण जिच्याकडे सरकारी यंत्रणेच्या अशा प्रकारच्या गैरवापराचा प्रतिकार करण्याचे कोणतेही साधन नसलेली! यामुळे महाविकास आघाडी (MVA) सरकार आणि विशेषतः शिवसेना, अडचणीत आले आहेत. यामुळे युतीचे भागीदार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नक्कीच नाराज होणार. आणि ही युती दिवसेंदिवस अव्यवहार्य होते आहे, ही भावना बळ धरत जाणार आहे. पण याचा अर्थ हे सरकार ताबडतोब पडेल का? तर त्याचे उत्तर आहे, नाही असेच आहे! 

अधिक स्पष्टीकरण द्यायचे, तर  हे सरकार इतके अस्थिर आहे की ते आणखी कमकुवत होऊच  शकत नाही. ते, अगदी पहिल्या दिवसापासून स्थिर कधीच नव्हते. ह्या आक्रसथाळ्या कृतीतून ही वस्तुस्थिती अधिक स्पष्ट पणे उघड  झाली आहे इतकेच. आता प्रश्न असा की, उद्धव सरकारनि असा कांगावेखोर पणा का केला? 

त्याचे दुहेरी स्पष्टीकरण आहे. पहिले सध्याच्या घटनांशी सम्बद्धतीत आणि वैयक्तिक, दुसरे दीर्घकालीन आणि राजकीय. 

ह्या ठाकरे सरकारला मान खाली घाली घालाव्या लागणाऱ्या घटनांची सुरुवात १४ जून रोजी सुशांत सिंग राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूपासून झाली. महाराष्ट्र सरकार घाईने ही आत्महत्या आहे असे घोषित करून मोकळे झाले. पहिली शंका ह्याचमुळे उपस्थित झाली. सुशांतच्या मृत्यूच्या एक आठवडा आधी त्याची मॅनेजर,दिशा सालियन हिचाही मृत्यू झाला होता. तुम्ही दोन्ही घटना एकत्र बघितल्या  तर हा योगायोग नाही हे कुणाच्याही लक्षात येईल. कंगनाने ताबडतोब 15 जूनला एक व्हिडिओ जारी केला. ज्यात तिने बॉलिवूड मधील एका विशिष्ट कंपूवर जोरदार हल्ला चढवला. ह्यात तिने जी लोकं ह्या कंपूचा हिस्सा नसतात त्या कलावंतांवर कसा बहिष्कार टाकला जातो हे उघड केले . ती पुढे म्हणते की, सुशांतला सुद्धा असेच बहिष्कृत केले गेले होते आणि जे एक प्रकारे त्याच्या  मृत्यूला कारणीभूत ठरले.  कंगना ह्याच विडिओ मध्ये तिला सुद्धा ह्याच कंपू मधील लोकांनी आत्महत्या करण्यास कसे उद्युक्त केले हेही सांगते.  

आता हे मान्य करण्यास काहीच हरकत नाही की, जिया खान किंवा दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रमाणेच सुशांतचा मृत्यू कंगनाने हा मुद्दा उचलून धरला नसता तर लोक नक्कीच विसरले असते . पण एकदा कंगनाने हा मुद्दा उचलून धरल्यावर लोकांचे कुतुहूल चाळवले . आणि आता टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडिया (SM ) नेटवर्कने ही बातमी उचलून घेतली. आणि काही वेळातच त्याचे राष्ट्रीय समस्येत रूपांतर झाले. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, ज्यामुळे रियाला अटक झाली . आता रिया जे गौप्यस्फोट करेल त्यामुळे ठाकरे कुटुंब घेरले जाणार हे नक्की.

कंगना मुळे ठाकरें कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगली गेली हे नक्कीच. पण त्याच बरोबर, त्यांचे राजकीय भांडवलालाही फटका बसला, हेही अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे कंगनाला धमकावणे, दरडावणे आणि क्षती पोहोचवणे हे तर शिव सेनेला प्राप्तच आहे. शिवसेना पक्षप्रमुख एका स्त्रीला, आणि तेही मराठी नसलेल्या स्त्रीला शरण गेले असे चित्र उभे राहिल्यास ते त्यांच्या प्रतिमेस शोभणार नाही. शिवसैनिकांसाठी ठाकरेंची, ‘सगळ्यात मोठा दादा’ किंव्हा खरं तर ‘भाई’ ही प्रतिमा फार महत्वाची आहे. ह्याच प्रतिमेच्या जोरावरती ते आपला खंडणीचा धंदा चालवतात. तर ‘बुलडोझर’, हा शिवसेनेच्या न्याययंत्रणेनी, बाळासाहेबांच्या सिंहासनाच्या वारसादाराचा अपमान केल्याबद्दल कंगनाला दिलेली शिक्षा होती. सेनेची ही न्यायपालिका, सरकारच्या न्यायपालिका पासून स्वंतत्र आहे. मग ते सरकार स्वतःचे का असेना. 

१० सप्टेंबरच्या, ‘सामना’ च्या “उखाड दिया” ह्या मथळ्यांमध्ये ही ‘भाई’  मानसिकता समोर येते.मुंबई  किंवा महाराष्ट्रा बाहेर शिवसेना हा राजकीय पक्ष असेल, पण मुंबईत ती एक ‘कुठलयाही कायद्याचं बंधन नसलेली संघटना’ (Extra Constitutional) आहे. ही संघटना लोकांचे आपसातली भांडण मिटवू शकते आणि सरकारी हस्तक्षेपाशिवाय न्याय पण देऊ शकते.  

आता या विचित्र कृतीमागचा दुसरा आणि मोठा उद्धेश, बातम्या वर नियंत्रण ठेवणे हा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून या MVA सरकारला मोठी नामुष्की पत्करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यंदा मराठा आरक्षण नोकरी आणि शिक्षण कोटया ला लागू होणार नाही, असा निकाल दिला आहे. आणि हे प्रकरण मुख्यन्यायाधीशांकडे मोठे खंडपीठ स्थापन करण्यासाठी पाठवले आहे. मात्र, मराठा कोट्या अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये झालेले प्रवेश कायम राहतील, असेही नमूद केले आहे. आणि ग्यानबाची मेख इथेच आहे. ह्याचा अर्थ असा, की मराठ्यांना जे नोकरी आणि शिक्षणात आज आरक्षण मिळते आहे, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये देणारा कायदा मंजूर केल्यामुळे.  ६५ वर्ष ज्यांनी मराठा मतांचे राजकारण केले, ते आज मराठयांना आरक्षण देऊ शकणार नाही आहेत. 

आणि ही एकमेव लाजिरवाणी गोष्ट नाहीये. कोरोना संसर्ग आणि मृत्यूच्या तक्त्यावर  महाराष्ट्र आजही अव्वल क्रमांकावर आहे. देशातले २५ टक्क्यांहून अधिक संसर्ग महाराष्ट्रात होत आहेत.महाराष्ट्रा इतकेच मोठे, पश्चिम बंगाल सारखे किंव्हा मोठे राज्य,उत्तर प्रदेश, महाराष्ट्रा पेक्षा चांगली कामगिरी करत आहे. त्यात भर म्हणजे,अनंत कुरसमुसे ह्यांना  जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी  मारहाण; ह्यासारख्या अनेक घटना महाराष्ट्रात घटतच असतात. उदारणार्थ, वाधवन सारख्या धोकेबाजांना महाबळेश्वरला बेकायदेशीरपणे प्रवास करण्याची परवानगी दिली जाते. किंवा वांद्रे स्थलांतरित कामगार दंगली सारखी परिस्थिती निर्माण करतात. आणि अर्थातच पालघर साधुंची क्रूर हत्या! एकूण काय उद्धव ठाकरे यांचे प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे रोज माध्यमातून होणाऱ्या बदनामी वर कंगना सारखे प्रकरण हा इलाज आहे.  

उद्धव ठाकरे फक्त प्रशासनातं अपयशी आहेत असं नाही. त्याचं आपल्याच पक्षातील  नियंत्रण सातत्याने संपत  चालले आहे. काँग्रेसशी हातमिळवणी आणि हिन्दुत्व हा अतिशय कठीण समतोल पार्टीतील नेत्यंना साम्भाळावा लागतो आहे. दुसरी गोष्ट, जिल्हा आणि तालुका स्तरावरील नेत्यां मधे विविध प्रशासकीय मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी होणार्या चकमकींवरुन नाराजी आहे. पारनेर चे 5 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मधे जाणे किंवा  खासदार संजय जाधव यांनी राजीनामा देणे ही त्याची जिवंत उदाहरणे आहेत. 

ह्या सरकार मधे चलबिचल असण्याचे आणखी एक कारण म्हण्जे, न थकता आणि कोरोनाला न घाबरता काम करणारे,विरोधी पक्ष नेते, देवंद्र फड़णीस. शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि उद्ध्व ठाकरे ह्याना 110 आमदार असणारया  भाजपची धास्तीच आहे. किंबहुना आज MVA आघाडी सरकार टिकून राहण्यामागे एक महत्वाचे कारण , कोरोना आहे. 

एकूण काय, हे ठाकरे सरकार पूर्णपंणे अपयशी सरकार आहे. आणि त्याकरता त्याना रोज टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशा कठीण काळात, हे असले दादागिरी चे हलके प्रदर्शन काही काळ लोकांना सरकारच्या चुकांचा विसर पाडू शकतात. पण ह्या सोशल मीडियाच्या काळात आणि भाजपसारख्या विरोधकी असतांना हे फार काळ चालणार नाही.लवकरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार ह्यांनी ना महाराष्ट्रातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. 

मी हा लेख संपवत असताना बातमी आली की, मदन शर्मा – निवृत्त नौदल अधिकारी, यांना या घरातून बाहेर काढून सहा शिवसेना गुंडांनी मारहाण केली. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सल्लागार संजय राऊत, मुंबईकराना Social Media वर प्रश्न विचारण्यासाठी यातना देणार हे अगदी स्पष्ट आहे. प्रिय मुंबईकर,करोना आणि सेना, समोर काळ कठीण आहे. मन घट्ट करा आणि तयार रहा!

Ajay Sudame

Editor - Indic Vichaar. Conservative, Nationalist, For Free Markets, Global Warming Denier. Engaged is Sales and Sales Management for living.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *