राफेल : एक बहुउद्देशीय लढाऊ विमान

फ्रान्स हुन 27 जुलैला जेंव्हा 5 राफेल विमानांनी भारताच्या दिशेनी उड्डाण भरली तेव्हा पासून तर विमाने भारतात 29 जुलै 2020 ला उतरे पर्यन्त भारतातील नागरिकांमध्ये विमानाबद्दल सर्व काही जाणून घेण्याची चढाओढ लागली. ह्या पूर्वी भारताच्या इतिहासात कधीही कोणत्याही विमानाचे स्वागत इतक्या उत्साहात  झाले नव्हते. ह्याची प्रमुख कारणे म्हणजे चीनच्या सीमेवर सुरू असलेली झटापट व विरोधी पक्षांनी विमानाचा कॉन्ट्रॅक्टवर  शिक्कामोर्तब होण्या आधी व नंतर घातलेल्या गोंधळाला  न जुमानता  सध्याच्या सरकारने हा महत्वाचा कॉन्ट्रॅक्ट पूर्णत्वाला नेला त्याचा झालेला आनंद.

 राफेल हे नाव आपल्यासाठी अगदी नवे असले तरी त्याचा इतिहास आहे 1986 पासूनचा जेव्हा, सर्वप्रथम ह्या विमान बांधणीची सुरवात झाली आणि 1991 मध्ये फ्रान्स वायुसेने साठी व नौदलासाठी प्रत्येकी दोन विमानानी उड्डाण  भरली. सर्वप्रथम 2004 मध्ये  फ्रान्स नौदलासाठी पहिले राफेल बनले. फ्रान्स वायुसेनेला B आणि C मॉडेल चे राफेल विमान 2006 मध्ये सुपुर्त करण्यात आले. त्यानंतर 2008 पासून राफेलची  सुधारीत आवृत्ती F-3 उपलब्ध झाली  ज्यात ऐरील रेकॉन्नैससन्स पॉड, व आण्विक शस्त्रे लावण्याची सोय होती त्यानंतर उपलब्ध असणारी सर्वच राफेल  विमाने F-3 श्रेणीचीच होती.

 भारतीय वायुसेनेला जी विमाने देण्यात आली आहेत ती सर्व F-3 श्रेणीची आहेत आणि पुढे त्यात सुधार करून F-4 श्रेणीची विमाने भारताला मिळतील असेही फ्रान्सने आश्वासन दिले आहे. राफेल हे एक अत्याधुनिक 4.5 generation चे विमान आहे, ज्याची  अनेक वैशिष्ट्ये अचंबित करणारी आहेत. Fly by wire, highly agile, net centric , अनेक शस्त्रास्त्रे (multi weapon) आणि बहुउद्देशीय (multi role) अशी ती वैशिष्ट्ये. ह्या विमानाचा वेग ध्वनी च्या वेगापेक्षा दुप्पट आहे व त्याची वेग मर्यादा  1.8 Mach आहे. ह्या विमानात बहू भूमिका क्षमता आहे  (Multi Role) हे विमान इलेक्ट्रॉनिक (electronic warfare), हवाई संरक्षण (air defence), थलसेनेला मदत (ground support) , आणि  शत्रू प्रदेशात  खोलवर जाऊन मारा (in-depth strike) ह्या भूमिकांमध्ये उपयोगात आणता येते त्यामुळेच, हे विमान भारताला हवाई श्रेष्ठता  (Air superiority) प्रधान करते असे म्हटले तर वावगे होणार नाही. राफेल हे स्वतःच्या वजनाच्या दीडपट वजन वाहून नेऊ शकते. 4.5 टन इंधन तर 9.5 टन शस्त्रे घेऊन ते लढण्यासाठी सज्ज असते. अतिशय उत्तम वेग, कमीत कमी अंतरात विमान उतरवण्याचे क्षमता (1500 फूट) ही ह्या विमानाची वैशिष्ट्ये आहेत. ही विमाने विमान वाहक जहाज वर (aircraft carrier)  पण उतरू शकतात इतकेच नव्हे तर हवेत इंधन घेण्याची क्षमता ह्या विमानांना हवेत जास्त वेळ राहण्याची संधी प्रधान करतात. 

  अजून एक अतिशय महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या विमानात असलेली सशास्त्र. पूर्वी भारताने जी विमाने घेतली त्याला पूरक अशी शस्त्रे आपण घेतली नाही ती चूक ह्यावेळी आपण सुधारली आहे असे म्हणता येईल. राफेल बरोबर राफेल साठीच निर्माण केलेली शस्त्रे आपण विकत घेतली त्यामुळे, त्याचा  उपयोग करताना त्यात तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता कमीच. तर ही शस्त्रे कोणती  हे पाहणे फार महत्वाचे आहे. ह्या विमानाबरोबर हवेतुन हवेत मारा करणारे meteor हे एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र आपण मिळवले आहे. ह्याची विशेषता अशी की हे एकाच वेळी अनेक लक्ष्याचा वेध घेऊ शकते जसे शत्रूचे विमान, शत्रूचे क्षेपणास्त्रे, UAV आणि शिवाय ह्याचा मारा शत्रूपासून 100 किलोमीटर दूर राहून करता येतो. MICA हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्राचा मारा अगदी जवळुन पण करता येतो नाहीतर शत्रू विमान नजरेत नसताना पण करता येतो, म्हणून शत्रुच्या विमानIजवळ न जाताच शत्रूच्या विमानाचा नायनाट करता येतो. हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी पण SCALP नावाचे एक क्षेपणास्त्रे आहे त्याचे ब्रिटिश नाव ‘स्ट्रॉम शँडो’ असे आहे. ह्या क्षेपणास्त्राने 560 किलोमीटर दुरून शत्रूच्या हवाईपट्ट्यांवर, बोटींवर, पुलांवर आणि अनेक सामरिक  महत्त्वाच्या  लक्ष्यांवर मारा करता येतो. असेच एक हवेतून जमिनीवर मारा करणारे ‘हॅमर’ नावाचे  क्षेपणास्त्रे पण लवकरच आपल्याला मिळणार आहे जे  शत्रूच्या अतिशय मजबूत अश्या बंकर्रर्सना पण 70 किलोमीटर अंतरावरून नेस्तनाबूत करू शकते. 

  बाकी विमानांच्या तुलेनेत हे विमान कसे श्रेष्ठ आहे हे  पाहणे योग्य ठरेल कIरण तेव्हाच त्याची  खरी योग्यता आपल्या लक्षात येईल. हे विमान पाश्चिमात्य देशाच्या कित्येक विमानाच्या Eurofighter, Super Hornet , Saab Gripen तुलनेत श्रेष्ठ आहे. ह्या विमानाची तुलना चीन आणि पाकिस्तान च्या सर्वात श्रेष्ठ अशा विमानानं बरोबर करणे अत्यावश्यक आहे. F-16 हे पाकिस्तानी विमान शत्रूपासून साधारण फक्त  75 किलोमीटर दूर राहून AM RAAM  ह्या शेपणास्त्राने मारा करू शकते, शिवाय विमानाचा वेग, शस्त्रास्त्रे नेण्याचे क्षमता , त्याची dogfight ची क्षमता ही राफेल च्या तुलनेत अतिशय कमी आहे. चीन चे J-20 विमान हे 5 th generation विमान असल्याचे म्हंटल्या जाते पण 4.5 generation च्या राफेल समोर ते अनेक कारणांमुळे कमीच पडते. सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की जे-20 ह्या विमानाचा उपयोग चीन ने कोणत्याही युद्धात केलेला नाही त्यामुळे ते विमान खरोखरच युद्ध स्थितीत कशी कामगिरी बजावेल हे कोणालाही ज्ञात नाही. ह्याउलट राफेल विमानाचा उपयोग फ्रान्सने अफगाणिस्तान, लिबिया, व माली बरोबरच्या युद्धात केला आहे व चांगलेच यश मिळवले आहे. राफेल हे जे-20 पेक्षा कितीतरी पटीने जास्त शस्त्रात घेऊन  उड्डाण करू शकते. राफेलची हिमालयातल्या उंचीवरी धावपट्ट्यावरून उड्डाण करण्याची क्षमता सुद्धा जे-20 पेक्षा श्रेष्ठ आहे. राफेलच्या इंजिनची विश्वसनीयता जास्त आहे शिवाय  देखभाल करण्यास ते जास्त सोईस्कर आहे. सर्वात  मोठा फरक म्हणजे राफेल हे विविध भूमिकांमध्ये उपयोगात आणता येते. राफेल एकाच उड्डाणात 4 विविध भूमिका पार पाडू शकते ही क्षमता जे -20 मध्ये नाही. राफेल 24 तासात एकंदर 5 मिशनसपार पाडू शकते पण जे-20 फक्त 3 मिशन. 

भारतासारख्या भौगोलिक आणि त्याच बरोबर हवामानाच्या विविधतेने वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या सीमा इतर कुठल्याही देशात नाहीत. उत्तरेत नगाधीराज हिमालय तर दक्षिणेत अथांग सागर आणि सागराने वेढलेली अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटे. पश्चिम दिशेला मिठाच्या खाड्या आणि वाळवंट, तर पूर्वेला समुद्री वादळे अंगावर झेलणारा तटीय प्रदेश. हिमालयीन रांगांनी वेढलेली ईशान्य सीमा. उत्तरेकडील 20 -22 हजार फूट उंचीवरील दाटी दाटीने उभे राहून डोकी उंचावणाऱ्या गगनचुंबी  बर्फाच्छादित पर्वत शिखरांच्या भिंतींची उत्तुंग हिमालयीन सीमा तिथे तैनात असलेल्या संरक्षण यंत्रणेपुढे  नित्य नविन कठीण आव्हाने उभी करीत असते. बर्फ वादळे, हिमस्खलन, हाडे गोठवणारी थंडी, आणि असल्याच तर अतिशय दमछाक करणाऱ्या निसरड्या वाटा. हिमालयातील तापमान उणे पन्नास अंश तर वाळवंटात  पन्नास अंशाहूनही अधिक. त्यामुळे प्रत्येक सीमेवर त्या भागातील भौगोलिक परिस्थितीसाठी उपयुक्त असणारी तसेच त्या हवामानात तग धरू शकणारी उपकरणे सेनादलांना तैनात करावी लागतात. विमानांचेही तसेच आहे. प्रत्येक भूभागासाठी उपयुक्त विमाने वेगवेगळ्या बनावटीची असतात. म्हणूनच राफेल विमान भारतातील ह्या विवधतापूर्ण  भौगोलिक प्रदेशाच्या सुरक्षितते साठी योग्य असे विमIन आहे. आपल्या वैमानिकांची जगातील उत्तम वैमानिकांमध्ये गणना होते आणि आपल्या वैमानिकानी ते बऱ्याच युद्धात आणि आतंरराष्ट्रीय कवायती मध्ये पण सिद्ध केले आहे. म्हणूनच ह्या जगप्रसिद्ध वैमानिकाना तितकीच चांगली विमाने  मिळाली तर शत्रूच्या मनात भय निर्माण करणे त्याच्यावर मात करणे  फारच सोपे होईल. राफेल विमानांचा वायुसेनेत समावेश करून आपण हेच साधले आहे. शत्रूवर दुरून मारा करण्याच्या क्षमतेमुळे अIपले वैमानिक शत्रूच्या क्षेपणास्त्र पासून सुरक्षित राहतील कIरण शत्रूच्या लक्ष्यावर  हमला  करण्यासाठी त्यांना शत्रुच्या हद्दीत आतवर शिरावे लागणार नाही. 

आत्मनिर्भरता हे ‘मेक’  इन इंडिया ‘चे पुढंचे पाऊलच म्हणता येईल. ह्या योजनेद्वारे  काही  क्षेत्राकडे म्हणजे संरक्षण क्षेत्र, औषधी क्षेत्र,  व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र ह्याकडे  आपण लक्ष्य केंद्रित केले आहे. आता सरकारला निजी कंपन्यांना पण वाव द्यावयास हवा, राफेल चा व्यवहार आपल्या देशाला ह्यात मदत करू शकेल. राफेल चा कौंट्रॅक्ट हा सप्टेंबर 2016 मध्ये फ्रेंच गव्हर्नमेंट बरोबर करण्यात आला, 36 विमानंIसाठी 7.87 बिलियन यूरोचा हा काँट्रॅक्ट आहे. त्यातील 3 बिलियन युरोचे काम भारतीय कंपन्यांना देणें अपरिहार्य आहे. त्यामुळे  आत्म निर्भरता ची चांगली सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल, व निजी कंपन्यांचा डिफेन्स क्षेत्रात हा प्रवेश समाजात येईल.

 राफेल हे  एक अष्टपैलु आणि बहुउद्देशीय (multirole) विमान आहे. हे  विमान शत्रूच्या अतिशय उत्तम हवाई संरक्षणाच्या कवचामध्ये सुद्धा  आपली कामगिरी बजावू शकते. अश्या  हवाई सरंक्षणाचा सामना भारतीय वायुसेनेला  चीन  आणि पाकिस्तान  सीमारेषेवर सतत करावाच लागेल म्हणून ह्या विमानाचे  महत्व अधीक. जगातले सर्वात उत्तम लढाऊ वैमानिक आणि जगातील सर्वात उत्तम विमान  ही जोडी कुठल्याही शत्रूरा -ष्ट्राच्या वायूसेनेवर मात करू शकेल ह्यात नसावी. भारतीय वायूसेने जवळ हवी तितकी विमाने सध्या नाहीत. विमानांची कमतरता आपण भरून काढतोच आहे पण ह्या अत्याधुनिक विमानाने थोडाफार भIर हलका होईल यात शंका नाहीच.  हवाई युद्धात जितके  उत्तम विमानाचे महत्व असते तितकेच  उत्तम वैमानिकाचे पण असते  आणि  आता हे दोन्हीही  आपल्याजवळ  असल्याने देशाच्या सुरकक्षिततेत हात भार लागेलच.   

AVM Suryakant Chafekar

Air Vice-Marshal Suryakant Chintaman Chafekar, AVSM, Sharuya, Shaurya Chakra is a retired Indian Air Force (IAF)officer. He was the Commander Officer of No 48 Squadron IAF. In May 2008, he landed Antonov AN-32 aircraft on High Altitude Advanced Landing Grounds Daulat Beg Oldie, Fukche, and Nyoma.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *