कोरोना – निसर्गानी माणसाला दिलेला धडा

मार्च महिन्यात अचानक या covid-19 नी आपल्या आयुष्यावर पकड घट्ट केली. जगभरात तर त्याने हात पाय पसरलेले बघतच होतो.पण हळूहळू  भारतातही त्याने आपले हातपाय पसरवले. Covid19 चे अतिशय दुरगामी परिणाम आपल्या आयुष्यावर झाले आहेत. Covid19 सर्व जगभरातील लोकांच्या ज्या काही मान्यता आहेत त्यावर विचार करायला भाग पाडले.आपल्या आयुष्याची प्रत्येक बाजू ह्या covid19 हादरवून सोडली.                  

पैसा, मिळकत ….काही ग्रुहीतक धरून आपण आयुष्य जगत असतो. जसं – “मी मेहनत करीन, येणारं काम करीन, पैसा मिळवीन.” माणसाची ही एक साधारण कल्पना म्हणा, मान्यता म्हणा. पण covid-19 आपल्या ‘कठीण काळाची’ व्याख्याच बदलून टाकली आहे. आपली काम करायची ताकद आहे पण काम नाही. काम नाही या परिस्थितीपासून कोणीही वाचलेला नाही. दुसरा मला जाणवलेला बदल म्हणजे….एक गोष्ट जी माझ्या लहानपणी बघीतलेली नव्हती ती काही वर्षापासून आम्हा सगळ्यांंच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाली होती. ती म्हणजे week ends ला बाहेर जाऊन खाणे. आमच्या लहानपणी इडली, दोसा, पाव भाजी हे weekends होणारे पदार्थ. बाकी दिवशी वरणभात, भाजी, पोळीच. पण पैसा यायला लागला आणि आमची lifestyle बदलू लागली. आम्ही 

Hoteling ही वर्षीतून २/३वेळा करत असू. गेल्या काही वर्षात Hoteling आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे.  Zomato, Swiggy वर मुलं order करतात ही आयांची गोड तक्रार असते. गोड ह्या साठी की मुलांमुळे आयांनाही कुठेतरी change मिळत होता. खात सगळेच होते–पण मुलं मागवतात हो, या सबबीखाली घरचे मोठे वाचतही होते आणि मजाही करत होते. पण या गोष्टीलाही covid-19 नी चाप बसविला. 

आपले सणवार साजरे करण्याच्या पद्धतीतही बदल आले. लो. टिळकांनी कोणत्या उद्देशाने सार्वजनिक गणपती सुरू केला होता आणि काही वर्षातील त्याचे आपल्या समोरील स्वरूप यात जमीन आसमानाचे अंतर आले आहे. यावर्षी covid-19 च्या निमित्याने का होईना गणपतीचीही ‘मुन्नी बदनाम हुई’ आणि तत्सम गाण्यातून सुटका झाली. घरोघरी महालक्ष्मी बसतात, यावर्षी तोही सण लोकांनी आटोपशीर रित्या साजरा केला.                

निसर्गावर तर covid-19 अतिशय अनुकूल परिणाम झालेला दिसला. नागपूरात दरवर्षी भयंकर उन्हाळा असतो. यावर्षी उन्हाळ्यात संचारबंदी होती. वाहनं कमी धावत होती. माझ्या आठवणीतील हा सगळ्यात कमी गरम उन्हाळा होता. गगेंचे पात्र सुद्धा स्वच्छ झाले. माणसाला कुठेतरी विसर पडला होता–की तोही इतर प्राण्यांप्रमाणेच निसर्गाचा भाग आहे. निसर्गाचा मालक नाही. Covid-19 मधे जी आथिर्क पडझड झाली आहे झाली आहे त्यातून कुठल्याही देशाला सावरायला वर्ष दोन वर्ष  लागणार. अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. ज्यांच्या टिकून आहेत त्यांंचे पगार किती मिळतात त्यांचे त्यांंनाच माहिती. अचानक लागलेल्या lockdown मुळे मजुरांचे अतोनात हाल झाले. काम करणाऱ्या हातांना काम राहीलेले नाही. गरीब श्रीमंत सगळ्यांना एकाच पातळीवर आणले. सामान्य लोक असू दे की celebrates सगळ्यांंनाच घरकाम करावे लागेल. Mobile ला शाळा काँलेज मधे बंदी होती. पण आज याच mobile मुलांचे शाळा,  काँलेज, शिक्षण सुरू आहे.            

थोडक्यात काय तर covid-19 नी आम्हाला आमच्या  आयुष्याबद्दलच्या कल्पना, संकल्पना यावर परत एकदा विचार करायला भाग पाडले. लवकरच covid-19 संपणार आहे. आपलं आयुष्य पुन्हा पूर्ववत चालू होईल…त्यावेळी या काळात आलेली समज आपण विसणार नाही अशी आशा आहे.

Revati Deshpande

Revati Deshpande

Psychotherapist, NLP Practitioner, Mother to a Daughter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *