हिंदुत्व,मराठी ‘अस्मिता’ आणि शिवसेना

मी कधीच शिवसेनेचा सदस्य नव्हतो. पण तरीही हिंदू ह्रदयसम्राट, बाळासाहेब ठाकरेंच्या ह्या पक्षा च्या माझ्या मनात अतिशय आंनददायीचं आठवणी आहेत. साधारण १९९० ते अगदी आतापर्यंत, शिवसेना भक्कम वैचारिक पातळीवर उभी होती. कट्टर हिंदुत्वा बरोबर ती ‘मराठी माणसा’ साठी लढण्या करिता ओळखली जात असे. ही भूमिका निभावताना सेनेला कधीही वैचारिक तडजोड करण्याची गरज पडली नाही. सेनेची ही भूमिका आणि भाजपचा हिंदू राष्ट्रवाद, ही युती वैचारिक पातळीवरच परिपूर्ण रित्या १९८९ मध्ये जमली. महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेबांमुळे या संबंधात शिवसेनेला नेहमीच प्राधान्य मिळत असे. शिवसैनिक स्वतःच्या पक्षाचा उल्लेख ‘एल्डर ब्रदर’ असा करत असत. आणि तो नाईलाजाने का होईना भाजपचे नेते मान्य करत. त्या काळी शिवसेना,राजकीय पक्षापेक्षा, एखाद्या गुप्त लष्करी संस्थे सारखी काम करत असे. आणि अभेद्य किल्या सारख्या भासणार्या मातोश्री (ठाकरे निवास) तून बाळासाहेब तो चालवत. 

२००६ मधे,पुतण्या राज यांनी सेना सोडून आपला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सुरू केला तेन्व्हा ह्या अभेध्यतेला थोडासा तड़ा गेला. पण सेनेशी थेट स्पर्धा असूनही राजनी, पक्षात बाळासाहेबांचा अनादर होणार नाही ह्याची काळजी घेतली. आणि शिवसेनेची मुंबई वरची पकड आणि बाळासाहेबांन वरच महाराष्ट्रच प्रेम त्यांचा मृत्यूपर्यंत कायम राहिलं. 

त्यानंतर एकापाठोपाठच्या दोन घटना, २०१२ मध्ये बाळासाहेबांचे निधन आणि २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर मिळालेले बहुमत,ह्यामुळे स्थिती बदलली. त्याच वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुका, अमित शहा यांनी २५ वर्षे जुनी युती तोडून, स्वबळावर लढायचं ठरवलं. त्यांचं परिस्थितीचं आकलन अचूक होतं. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला ज्या मोदी लाटेमुळे २८२ जागा मिळाल्या होत्या, त्यांच्याच बळावर  भाजपला ऑक्टोबर मध्ये सर्वोत्तम १२२ जागा जिंकता आल्या. आणि पहिल्यांदाच स्वत:चा मुख्यमंत्री नेमता आला. 

शरद पवारांनी,ह्यावेळला आजपर्यंत न घेतलेला ‘U-Turn’ घेत भाजपला पाठिंबा दिला. ज्यामुळे उद्धव ठाकरेंना सरकार मध्ये सामील होण्या शिवाय पर्याय राहिला नाही. आणि जरी भाजपनी शिवसेने बरोबर पाच वर्षे सत्ता राबवली, तरी भाजप-सेनेतील मैत्री संपली. या संपूर्ण कार्यकाळात विविध मुद्द्यांवर सेनेने भाजपला कडाडून विरोध केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुका आल्या,तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवारांच्या सहकार्याने भाजपच्या पाठीत सुरा मारण्याची योजना आखली.  निवडणुकीनंतर ती तातडीने सक्रिय करण्यात आली. उद्धव यांनी भाजपला अशक्य अश्या मागण्या केल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. सत्ते करता एवढी मोठी वैचारिक तडजोड करताना उद्धव यांना कोणताही विचार केला नाही. कट्टर हिंदुत्व ते काँग्रेसशी युती! तोच काँग्रेस पक्ष, ज्या पक्षाने केवळ अल्पसंख्याकांना खुश ठेवण्यासाठी, फक्त राम मंदिराचा विरोध केला असे नाही, तर् प्रभू रामाचे अस्तित्वच नाकारले. 

आता इथे असा युक्तिवाद करता येईल की, २०१४ मध्ये अमित शहा ह्यांनी युती तोडली म्हणून, २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव यांनी संबंध तोडून परतफेड केली. पण हे धाधान्त खोटे आहे. इतर राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनाही संधीसाधू आहे. संधी पाहून ती  हिंदुत्वाकडे वळले. ते तीस वर्षे हिंदुत्व आणि भाजपला चिकटून राहिले, कारण भाजपने इतकी वर्षे सेनेला पक्ष वाढवायला संधी ठेवली होती. पण ज्या क्षणी भाजप आक्रमक झाला आणि अमित शहांनी तडजोड करण्यास नकार दिला, त्या क्षणी उद्धवनी युती तोडली. 

एक नजर शिवसेनेच्या निवडणुकीच्या इतिहासावर टाकली तर ते अधिकच स्पष्ट होते. 

लोकसभा :

१९७१ – ५ जागा लढवल्या – ० जागा जिंकल्या.

१९८० – लढवल्या २,  ० जागा जिंकल्या

१९८९ – लढवल्या ३, १ विजयी (भाजपशी युती)

१९९१ –  लढवल्या २२, विजयी ४

सेनेनी ज्या वर्षी (१९८९) भाजपशी  युती केली, त्याच वर्षी गोवा विधानसभा निवडणुकीत ६ जागांवर भाजपला टक्कर दिली. १९९१ मध्ये,पुन्हा यूपी मध्ये १४ विधानसभा जागा लढवल्या. १९९३, मध्यप्रदेश मध्ये,८८ जागांवर लढा दिला आणि ० जिंकले. येथे तुम्ही सेनेच्या निवडणुकीतील कामगिरीवर एक नजर टाकू शकता.महाराष्ट्र वगळता बाकी राज्यात आनंदी – आनंद आहे. तर थोडक्यात काय, राज्यात ३० वर्षे युती असताना सेना महाराष्ट्रा बाहेर, भाजपला राजकीय शत्रू मानत आली आहे. त्यामुळे तत्त्वता तडजोड झाली किंवा भाजपानी, सेनेला धोका दिला आहे, हा युक्तिवाद खोटारडे पणाचा आहे. शिवसेना ३ दशकं भाजप सोबत होती, कारण ते त्यांना राजकीय दृष्ट्या सोयीचे होते. २०१९ मध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची साठी, उद्धव ठाकरेंनी ती तोडली! बाकी सगळे झुट!

सुरवातीला बरीच वर्षे, शिवसेना, “मराठी माणसाच्या नोकऱ्या हिरावून घेतात”  ह्या बहाण्याने दक्षिण भारतीयांना विरोध करत असे. ‘उठाव  लुंगी, बजाओ पुंगी’ असा लाजिरवाणा नाराही त्यांनी तयार केला होता. दक्षिण भारतीय पुरुषां मध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या पेहरावाला लक्ष्य करणे,हाच त्याचा उद्देश होता. पुढे काही वर्षांत ह्या धोरणात बदल करून, सेनेनी हिंदुत्वाचा स्वीकार केला कारण, त्यात राजकीय फायदा दिसला.एक उद्योन्मुख ‘व्होट बँक’ दिसली. आणि त्याचा, सेना आणि भाजप, दोघांनाही ह्याचा फायदा झाला. १९८९ ते २०१९, ह्या ३० वर्षात युतीला तीनदा बहुमत आले. सेनेनी तिसऱ्यांदा, भाजपशी दगाबाजी करून NCP-Cong बरोबर साटंलोटं केलं हा भाग वेगळा . 

आता सत्ता काबीज करण्यासाठी  तर उद्धव यांनी एक मोठी तडजोड केली, पण सत्तेत टिकून राहण्यासाठी तर त्यांनी सगळ्या सीमा पार केल्या आहेत. त्यांनी केलेल्या  तडजोडींची एक छोटीशी सूची बघा.

डिसेंबर २०१९ मध्ये, शिवसेनेनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला, पण सोनियांकड्न दट्या पडल्या बरोबर राज्यसभेत त्याला विरोध केला. जानेवारी २०२० मध्ये उद्धव यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईची तुलना २६/११ शी केली. फेब्रुवारी २०२० मध्ये या उद्धव सरकारने महाराष्ट्रातल्या आरटीई (RTE ) मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदू साठीचा कोटा रद्द केला.  मोदी सरकारने जानेवारी २०१९ मध्ये, हिंदू समाजाच्या त्या घटका करीता हा खास कोटा जरी केला होता ज्यांना दुसऱ्या कुठलाही Reservation चा लाभ मिळत नाही. गरीब आणि वंचित असलेल्या हिंदू समाजाच्या हितावरचा उद्धव रावांनी केलेला हा सगळ्यात क्रूर हल्ला आहे. 

तर निष्कर्ष काय? ज्या दोन खांबी तंबू, हिंदुत्व आणि मराठी माणसांच्या हिताचे रक्षण, वर सेना उभी होती, त्यातला हिंदुत्वाचा खांब उद्धव रावांनी सत्तेसाठी बळी दिला. राहिला मराठी माणसाच्या हिताचा प्रश्न, तर त्यालाही तिलांजली देण्यापासून सेने फारशी लांब नाही. किती लोकांना, हे माहित आहे, कल्पना नाही, पण ठाकरे कुटुंब, १९८८ पासून ‘ हिंदी सामना आवृत्ती चालवत आहेत. एक काळ असा होता की राष्ट्रीय टीव्ही चॅनल्सवरही एक मराठी प्रवक्ता पक्षाचे प्रतिनिधित्व करत असे. नवे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केवळ हिंदी भाषिक प्रवक्तेच TV वर येत असतात. 2019 मधे जेन्व्हा राज्यसभेच्या  जागे करता नेमणूक करण्याची वेळ आली तेन्व्हा,उद्धव कोणाही जुन्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ शकले असते. पण त्यांनी प्रियांका चतुर्वेदी, या काँग्रेस सोडून, सेनेत आलेल्या हिंदी भाषिक महिलेची निवड केली. केवळ हिंदी बोलतात म्हणून, राज्यसभे वर पाठवले असे म्हणणे नाही, पण तोही एक निकष होता हे विसरून चालणार नाही.आणखी एक उल्लेखनीय बदल म्हणजे, आतापर्यंत गुजराती भाषिकांवर हल्ला करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सेनेच्या नेत्यांनी आता गुजराथीत फलक लावायला सुरुवात केली आहे. 

एव्हढ्यानी झाले नाही. आपल्या दुस-या अवतारात सेनेने जाणीवपूर्वक आदित्य, एक तरुण, उदारमतवादी,  बॉलिवूडच्या प्रेमात असलेला चेहरा पुढे आणला आहे. कुणीतरी कि जो, फुटबॉल आणि पर्यावरण चा उल्लेख करू शकेल. आणि सेना कशी ‘लिबरल’ झाली आहे हे लोकांना पटवू शकेल.

आणि ह्या नवीन रूप धारण करण्यामागे  प्रबळ कारण आहे. आकडेवारी! सातत्याने इतर राज्यांतून होणाऱ्या प्रवाहामुळे मुंबईतील मराठी लोकसंख्या केवळ ३८ टक्के राहिली आहे. त्यामुळे ‘लोकल’ किंवा ‘मराठी माणूस’ राजकारण अतिशय धोकादायक आहे. त्यातही, आणखीन एक महत्वाची गोष्ट जी उद्धव ठाकरे विसरणार नाहीत ती म्हणजे मागच्या अनेक निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येनी  मराठी जनतेनि  सेनेपेक्षा भाजपला प्राधान्य दिले आहे. नुसतं मराठी-मराठी जप करून फार दिवस जनतेला भुरळ पाडता येत नाही.  

त्यामुळे ‘मराठी माणूस’ हि भूमिका सोडून सर्वसमावेशक पक्ष म्हणून जनत्याच्या समोर येणे हे शिवसेना क्रमप्राप्तच आहे. कंगना राणावतचं ऑफिस उद्ध्वस्त करणं किंवा मदन शर्मा सारख्या माजी नौदल अधिकाऱ्या वर  हल्ला करणे, हे केवळ मराठी जनतेला  अजूनही शिवसेना ‘आपलीच’ आहे असं वाटत राहवं म्हणून केलेले मर्कट चाळे आहेत. २०२२ मध्ये होणाऱ्या  BMC च्या निवडणुकीत जनता ह्याला उत्तर देईल हे नक्की. 

 

Ajay Sudame

Editor - Indic Vichaar. Conservative, Nationalist, For Free Markets, Global Warming Denier. Engaged is Sales and Sales Management for living.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *