जैविक युद्धाची जगावर सावट
दसरा सण आपण चांगल्या प्रवृत्तीचा वाईट प्रवृत्तीनं वर विजय म्हणून साजरा करतो. श्री रामचंद्रांनी रावणाला पराभूत केले तो हाच दिवस…. सद्य परिस्थतीत वाईट प्रवृत्तीनंवर मात म्हणजे जैविक शस्त्राच्या विरुद्ध लढा. कोरोना मुळे जैविक शस्त्रे कसा हाहाकार माजवू शकतात हे सर्व जगालाच कळले आहे. तर जैविक युद्धासाठी कशी तयारी केली पाहिजे हे पाहणे फार महत्वाचे ठरते.
संपूर्णे जग जेव्हा करोना विरुद्ध लढत आहे तेव्हाच चीन मधून आलेली एक बातमी आश्चर्यकारक ठरते साठ हजार चीनी लोकांना करोना विरुद्ध लढण्यासाठी लस टोचण्यात आली ही ती बातमी. कोरोनाची सुरुवात चीन मधून झाली हे जगाला जेव्हा कळले तेव्हांच सर्वाना ही कल्पना होती की चीन्यानी लस सुद्धा बनवली असेलच.
डॉक्टर फ्रान्सिस बॉयले जे की आंतरराष्ट्रीय कायद्याचे अमेरिकेच्या एका विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि ते जैविक शस्त्रास्त्रे कायद्याचे प्रवर्तक होते त्यांनी एका स्फोटक वक्त्याव्यात जगाला सांगितले की 2019 मध्ये चीन मधून पसरलेला कोरोना हे जैविक युद्धात उपयोगात आणले गेलेले एक हत्यारच होते आणि, त्याबद्दलची जागतिक स्वास्थ संस्थेला पूर्ण कल्पना होती. त्याचे असेही म्हणणे आहे की कोरोना विषाणू हे अतिशय घातक असे जैविक हत्यारच आहे किव्हा जनुकीय सुधारित जैविक शस्त्रच आहे. म्हणूनच चीनने ह्याबद्दल ची माहिती प्रथम लपवून ठेवली.अशा प्रकारचे उधबोधन तेही एका प्रसिद्ध व्यक्ती कडून झाल्याने ते हसण्यावारी नेता येणार नाहिच.
प्रथम आपण जैविक शस्त्रे म्हणजे काय हे बघावयास हवे. हे अति सूक्ष्म जीव असतात जसे की विषाणू , जिवाणू ,बुरशी ते मुख्यता मुद्दाम उत्पादित केले जातात रोगराई पसरविण्यासाठी, ज्यामुळे मनुष्य , प्राण्याची, आणि वनस्पतींची जीवहानी होते. अश्या ह्या जिवाणू व विषाणू मुळे मोट्या प्रमाणात जीवहानी तर होतेच आणि अगदी कमी वेळात ह्याचा प्रभाव सर्वदूर दिसून येतो. त्याचा प्रसार थांबवणे पण फार कठीण होते. जैविक दहशतवादाच्या अश्या हल्यामुळे साथ रोग पसरतो. सामूहिक नाश शस्त्रे जसे रासायनिक शस्त्रे, आण्विक शस्त्रे, आणि रेडियोलॉजिकल शस्त्रे जितकी विधवंसक असतात तितकेच किंबहुना जास्तच जैविक शस्त्रे विधवंसक असतात. जैविक शस्त्राचा उपयोग हा एक गंभीर विषय आहे आणि त्याची गंभीरता ही शस्त्रे आतंकवाद्यांना हातात पडली तर अजूनच वाढेल.
मनुष्याचे जीवन सुलभ व्हावे ह्या साठीच विज्ञानाचा उपयोग केल्या जातो. पण आण्विक शक्ती च्या शोधा नंतरचा अनुभव तितका काही चांगला नाही, कारण मनुष्याचे जीवन सुलभ व सुखसोयींचे व्हावे म्हणून केलेला अणू शक्तीचा प्रयोग त्याचा बॉम्ब बनविण्याच्या प्रयोगाने फसला असेच म्हणता येईल. तर सर्वप्रथम आपण कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगात आणून केलेला एक प्रयोग पाहू जो की मानवाच्या उद्धारासाठी आहे असे म्हटले जाते ‘स्वायत्त प्राणघातक शस्त्र प्रणाली’(LAWS म्हणजे Lethal Autonomous Weapon System) अशी शस्त्रे आहेत की जी लक्ष्य निवडतात, शोधतात, आणि मग वार करतात आणि हे सर्व मानवाच्या हस्तक्षेपा शिवाय साध्य होते. संपूर्णे स्वयंचलित किंवा अर्ध स्वयंचलित शस्त्रे अशे दोन्ही प्रकार उपयोगात आणले जातात ह्यात संपूर्ण स्वयंचलित अधिक घातक असतात कारण त्यात मनुष्यIचा कोणताही हस्तक्षेप नसतो. अशा शस्त्रांना आपण ‘किलर रोबोट्स ‘म्हंटले तर वावगे होणार नाही कारण हे रोबोट्स माणसासारखे थोडीच वागणार आणि मानवनिर्मित नियमIचे पालन करणार. नीती शास्त्र आणि जीवनाची मूल्ये मानवप्रमाणे त्यांना पIळता येणे शक्य नाही म्हणूनच त्याची निर्णय घेण्याची शक्ती ही अमानवीय असेल अस म्हणता येइल
आता आपण अशे काही जैविक शोधावर काम सुरू आहे का हे बघूया! अमेरिकेत 4 वर्षा पासून जवळजवळ 45 मिलियन डॉलर चा उपयोग करून कीटक सहयोगी (Insect Allies) नावाचा एक प्रयोग सुरू आहे. विषाणू वाहून नेणारे किटाणू तयार करून त्यांना मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडून पिकांवरील किटाणू मारून टाकण्याचे कार्य ते करतील असा हा प्रोयग पिके वाचवण्यात मदत करेल. पण हेच ज्ञान जर आतंकवाद्याच्या हातात पडले तर त्याचा प्रयोग ते त्यात काही सुधारणा करून रोगराई पसरवन पिकांच्या नासाडी साठी करू शकतात. मग ह्या सर्वावर उपाय काय ?
सर्व प्रथम आपण साधारण कोणत्या देशांजवळ ही जैविक शस्त्रे आहेत किव्हा असण्याची शक्यता आहे हे बघू कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, आफ्रिका, सीरिया, इराक, इराण, लिबिया, रशिया, आणि अर्थातच अमेरिका . जैविक शस्त्रास्त्रे अधिवेशन ही संस्था Biological Weapons Convention (BWC) जैविक शस्त्रास्त्रे बनविण्यावर व त्याच्या युध्दासाठी उपयोगावर बंदी घालण्याचे कार्य करते. भारताने ह्या कराराला मान्यता दिली आहे व अमलबजावणी पण करत आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून जगातील सर्व प्रोयोगशाळावर लक्ष ठेवण्यात येते. वर्षातून एकदा अशा सस्थानाची तपासणी केली जाते व अहवाल, समिती पुढे माडण्यात येतो. पण कोणत्याही कायद्या अभावी जे देश ह्या नियमांचे उल्लंघन करतात त्याच्यावर BWC ला कारवाही करता येत नाही म्हणूनच ही संस्था दिलेले कार्य पूर्णत्वास नेण्यास सक्षम नाहीं. उल्लंघन झाले तर औपचारिक तपासणी करण्याचा हक्क त्यांच्या जवळ नाही.
मग भारताने ह्या संकटाला कसे सामोरे जIवे ? प्रथम आपण आपल्या प्रजेच्या सुरक्षिततेचा विचार करावयास हवा. सर्वप्रथम आपण पुढाकार घेऊन आरोग्य सुरक्षिततेला असणारा धोका लक्षात घेतला पाहिजे, मुख्यतः जिथे खूप मोठा जमाव आहे, जसे विमानतळ रेल्वे स्थानक. ह्याच बरोबर राष्ट्राने आपत्कालीन स्थितीला तोंडं दयावयास तयार असायला हवे. हे तेव्हा साध्य होईल जेव्हा आपण स्वास्थ आपत्कालीन परिस्थिती जाणून घेउ शकु व त्यावर उपाय करू शकू. ह्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन सक्षम व सुदृढ हवे. भारत एक अत्यंत यशस्वी व लोकशाहीवर विश्वास असणारा देश आहे, सहजीवन व्यवस्थापनेत आपला विश्वास आहे, आपण कोणाशी ही संघर्ष करण्यात स्वारस्य दाखवत नाही, आणि आपण ‘सयुक्त राष्ट्रचे’ जबाबदार सदस्य आहोंत त्यामुळे आपण आपली महत्वाची जबाबदारी उचलली पIहिजे. यासाठी आपण सर्वप्रथम मानव कल्याणाच्या नावाखाली LAWS सारखे प्रयोग करण्याची अनुमती देऊ नये जे मानवाच्या उत्कर्षाच्या विरोधात असतील. कारण अशे प्रयोग यशस्वी झाले व वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती पडले तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आण्विक शक्ती चा झालेला दुरुपयोग लक्षात ठेवून आपण जैविक शस्त्रंIविरुद्ध ताबडतोब उपाय योजले पाहिजे. करोन विरुद्ध लढाईत आपल्याला जे अनुभव आले त्याचा उपयोग आपण जैविक शास्त्राच्या विरुद्धच्या अश्या लढ्यात केला पाहिजे. अश्या धोक्यापासून बचावाची जय्यत तय्यारी ठेवली पाहिजे. उत्तर आणि उत्तर पूर्व सीमांवर सतत जागृत राहिले पाहिजे. देश संरक्षणासाठी सतर्क राहणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे ह्यासाठी लागणारी पूर्वतय्यारी आपण केली पाहिजे, व ह्या संकटा पासून खबरदार राहिले पाहिजे.