चतुर्विंशति केशव नाम

पाशांकुशाहिडमरूककपालशूलै: खट्वांग शक्तिशरचापयुतैर्भवन्ति||
अन्योन्यहस्तकलितै: कति मूर्तिभेदा: शंभोर्हरेरिव गदारिसरोजशंखै:||

शंकराला पाच डोकी होती आणि हातात दहा प्रकारची शस्त्रं होती. त्यांची नावे द्यायची झाली तर, पाश, अंकुश, सर्प, डमरू, कपाल, शूल, खट्टवांग ,शक्ती, शर,धनुष्य. आणि त्यामुळे असं गृहीत धरलं होतं की त्याच्याकडे दहा हात आहेत. शंकराच्या विविध मूर्ती आपण बघतो त्यात आपल्याला हे बघायला मिळते. हिच  गोष्ट आपण गणिताच्या आधारे सोडवू. भास्कराचार्याने आपल्या मुलीला गणित शिकवण्यासाठी पुस्तक (११५० मध्ये) लिहिले. आणि त्याला तिचेच  नाव दिली  – लीलावती! ह्या पुस्तकात बिजगणित, भूमिती, मोजमापन, संख्याशास्त्र इत्यादी गणिताचा पाया असणारे अध्ययाय  आहेत. हे पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून ७०० वर्षे वापरले गेले.

आता आपण भगवान शंकराच्या विविध रूपांकडे येऊ. शंकराच्या प्रत्येक हातात एक शस्त्र ह्याप्रमाणे १० शस्त्र अशारितीने अरेंज करता येतील. 

 10!= 3628800 विविध प्रकारे . 

म्हणजेच 10!= ( 10x9x8x7x6x5x4x3x2x1)= 3628800

अर्थात भगवान शंकराची एवढी भिन्न रूपे. जे मानव जातीला मूर्तिस्वरूपात दाखवणे अशक्य आहे. 

भगवान विष्णू कडेही चार शस्त्र होती; ज्यांची नावे अशी शन्ख, गदा , कमळ ,चक्र इत्यादी . ही शस्त्र त्याच्या भुजांमधे असायची . आता आपण गणिताच्या साहाय्याने हे पाहू की  ही शस्त्रे किती विविध प्रकारे अरेंज करता येतात ते. 

4!= 4x3x2x1=24  प्रकारे.

त्यामुळेच विष्णूचे २४ रूपे आहेत वेगवेगळ्या नावाने. विष्णूच्या सगळ्या २४ रूपांचे शिल्प सारखे दिसतात फक्त ते शस्त्रे घेतलेल्या हातांच्या पोझिशन मध्ये तेवढा फरक दिसतो.  ह्या २४ नावांच्या ग्रुपला एकत्रितपणे चतुर्विशति केशव नाम असे म्हटले जाते. तसे पहिले तर विष्णूची अनंत नवे आहेत पण ह्या २४ नावांना महत्त्व आहे कारण  ते संध्यावंदनाच्या सुरुवातीला घेतली जातात . खाली २४ नावाची यादी दिली आहे आणि शस्त्रांचा क्रम ही आहे ज्या प्रकारे ती विष्णूच्या ४ भुजांमध्ये आहेत.

४ भुजांचा क्रम असा आहे- खालची उजवी बाजू , वरील उजवी बाजू, वरील डावी आणि खालील डावी बाजू .

    क्रमांक      वायुः नाम    शस्त्राचा क्रम
          केशवपद्म , शंख, चक्र, गदा
        नारायणशंख, पद्म , गदा , चक्र
          माधवगदा, चक्र, शंख , पद्म
 ४          गोविंदचक्र ,गदा,पद्म, शंख
          विष्णूगदा, पद्म, शंख ,चक्र
      मधुसूदनचक्र ,शन्ख, पद्म ,गदा
      त्रिविक्रमपद्म ,गदा, चक्र ,शंख
        वामनशंख ,चक्र, गदा, पद्म
        श्रीधरपद्म ,चक्र, गदा, शंख
१०    ह्रिषीकेशगदा, चक्र, पद्म, शंख
११          पद्मनाभशंख , पद्म, चक्र ,गदा
१२          दामोदरपद्म ,शंख, गदा, चक्र
१३          संकर्षणगदा, शंख, पद्म ,चक्र
१४          वासुदेवगदा, शंख, चक्र पद्म
१५          प्रद्युम्नचक्र, शंख,गदा, पद्म
१६          अनिरुद्धचक्र, गदा, शंख, पद्म
१७          पुरुषोत्तमचक्र, पद्म, शंख, गदा
१८          अधोक्षजपद्म, गदा, शंख, चक्र
१९        नरसिम्हाचक्र, पद्म, गदा, शंख,
२०          अच्युतगदा , पद्मा, चक्र, शंख
२१          जनार्दनपद्म, चक्र,शंख, गदा
२२          उपेंद्रशंख, गदा , चक्र, पद्म
२३            हरीशंख, चक्र, पद्मा, गदा
२४          कृष्णशंख, गदा ,पद्म , चक्र

           

अहमदाबादपासून 135 किलोमीटर पाटण नावाचे गाव आहे गुजरातमध्ये .तिथे ११ व्या शतकाच्या शेवटी एक विहीर बांधली गेली जी “राणी की वाव” म्हणून प्रसिद्ध आहे. पायऱ्या असलेली विहीर आहे ती जिथे विष्णूच्या २४ मुर्त्यांपैकी १५ रूपे सुंदर अशा शिल्पाच्या कृतीतून साकारले गेले आहेत. 

मुंबई मध्ये पण फणसवाडी भागात व्यंकटेश्वर मंदिरात २४ प्रकारच्या विष्णूच्या प्रतिमा शिल्पाकृती अस्तित्वात आहेत. स्थानिक भागात हे मंदिर बालाजी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.   

Translated by Mrs. Shraddha Sudame. This article was published by Indictoday.com on 14th Oct 2018. The link to that article is given below.

24 Names Of Vishnu

Chandrahas Halai

Chandrahas Halai

Chandrahas Halai is a mathematics enthusiast from the land of the Shulba sutras, the Bakhshali manuscript, and mathematicians like Aryabhatt, Brahmagupta, Bhaskaracharya, Ramanujan and many more. He is a consultant in the field of computer aided engineering, engineering optimisation, computer science and operations research. He writes research papers, articles and books on mathematics, physics, engineering, computer science and operations research. In his spare time he likes doing nature photography and painting.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *