पुरोगामी अष्टपैलू काका
काका तुम्ही बरं केलंत…सचिनला दम दिलात तो! समजतो काय स्वतःला? क्रिकेटपटू असेल आपल्या घरचा. (खरं म्हणजे घर सुद्धा काकांच्या मर्जी नि मिळालं असणार. नाय…म्हणजे काकांनी मुंबईत जागाच नसती सोडली तर सचिन नि घर कुठून बांधलं असतं?) असेल सगळ्यात मोठा शतकवीर…असेल राखला मान देशाचा! पण म्हणून काय त्याला रिहाना आणि मिया खलिफा विरुद्ध बोलायचा अधिकार मिळत नाही! आणि तेही जेंव्हा की तिनी गरीब शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे!
सचिन, तुझं चुकलंच!
पण, एक सेकंद…सचिननि असं काय केलं कि पुरोगामी काका एवढे खवळले? त्यानी सुप्रिया ताइं विरुद्ध टीका केली? नाही! मोदी किंव्हा भाजप करता मतं मागितली? नाही! बारामती करांचे मुंबईतले (किंव्हा पुण्यातले) चार भूखंड विदर्भातल्या लोकांना वाटा असं म्हणलं? नाही. तर मग सचिन नि असं काय केलं? त्यांनी फक्त, ट्विट करून बाहेरच्या (परदेशी) लोकांनि देशातल्या अंतर्गत मुद्द्यांवर बोलू नाही असं मतं जाहीर केलं. मग ह्यात अवाजवी असं काय आहे? तर, ह्यात भानगड एवढीच, कि काकांची लाडकी, रिहाना आणि मिया खलिफा ह्यांनी शेतकरी आंदोलनाला ट्विटर वरून पाठिंबा जाहीर केल्यानंतर सचिननि आमच्या भानगडीत पडायचं काम नाही, अशा अर्थाच उत्तर दिलं! आणि ते पुरोगामी (डावे, काँग्रेस,आप, सपा, तुका,माका) नेत्यांना चांगलंच झोम्बलं! बाकी नेते नुसते हात चोळत् बसले! त्यातल्या कोंणाचकडे ते वैचारिक अधिष्ठान नाही,जे काकान कड़े आहे. काका खरे-खरे पुरोगामी आहेत!
काकानी सचिन आणि लता मंगेशकरला सज्जड़ दम दिला. आणि तिथेच ते थांबले नाहीत. तर,गृहमंत्र्याना लगेच,ह्या दोघान विरुद्ध (आणि बाकी सगळ्या celebrities,ज्यांनी राश्ट्रीय एक्या साठी ट्वीट केल्या होत्या त्यांच्या विरुद्ध) चौकशी चा निर्देश पण दीला! खरा पुरोगामी असा असतो!
काका देशद्रोही नाहीयेत!
आता तुम्ही म्हणणार की काका देशद्रोही झाले की काय? तर खबरदार IT Cell वाल्यानो…तसं अजीबात नाहीये! तुम्ही जर काकान्च्या लाड़क्या पद्मश्री राजू बॉक्सर ला राष्ट्र्द्रोहाची नोटिस पाठवु शकता तर काकाही त्याचा वचपा काढू शकतात!अस नाय…काकांचा नाद नाय करायचा!
पण ते महत्वाचं नाही! महत्वाचं हे कि, काकांची सचिन आणि लता दीदींना तंबी देंण्यामागे भूमीका इतकीच की ज्याना राजकारणातलं काही गम्य नाही, काही भूमीका नाही, त्यानी ऊगाच मधे तोंड खपसू नाही! बरोबरच आहे,नाही का? आता हेच बघाना रिहाना,जी अमेरिकेतली एक अतीशय नावजलेली शेतकरि नेता आहे. (थाम्बा दुष्ट भक्तनो,लगेच तिचे ‘तसले’ फोटो टाकू नका!ते पण,ती गरिब मुलगी पोट भरण्या करताच करते) आणि मिया खलिफा? ती पण एक अतिशय प्रसिद्ध कामगार नेता आहे! तर थोडक्यात काय, ह्या दोघीनाही शेतकऱ्यांच्या प्रश्ना वर बोलायचा पूर्ण हक्क आहे.
पण सचिन? आणि लता बाई? अजय देवगण? ह्यांना देशाच्या अखंडते बद्दल बोलायचा काय हक्क आहे? काकांनी बरोबरच केलं सचिन आणि लता मंगेशकर वर चौकशी बसवून!
अष्टपैलू काका…
आता ह्यावर भजनी मंडळ म्हणणार कि जे काका कधी गोटी-ब्याट सुद्धा खेळले नाहीत ते जर BCCI चे Chairman होऊ शकतात, तर सचिन देशाच्या स्वायत्तते बद्दल का बोलू शकत नाही? तर बाळांनो, हेच तर काकांचं अष्टपैलुत्व आहे, जे तुमच्या सारख्याना दिसत नाही! आजपर्यंत सचिन नि काय केलं? तर म्हणे जन्माला आल्यापासून हातात बॅट धरून ठेवली! मग धावा निघणारच न? त्या लता बाईचं तेच. त्यांना तर त्यांचे वडील मास्टर दीनानानाथ ह्यांनीच संगीताचं बाळकडू दिल. मग ऐवढा घरून पाठिंबा असताना गाणं म्हणलं नसतं तरच आश्चर्य! जी कथा ह्या दोघांची तीच मोदीजींची. बालपणापासून काय तर म्हणे RSS आणि भाजप. मग काय होणारच न पंतप्रधान! आणि ह्यातही लगेच तीरके शेरे मारण्याची गरज नाही. काका मागच्या तिन दशकान पासून भावी पंतप्रधान आहत! मोदीजी ना जमेल का हे? मग! उगाच आपल काहितरि!!!
काकाना सचिन किंव्हा लता किंव्हा मोदीजी सारखी फुलाच्या पायघड्यांवर चालत आयुष्य नाही गेलं! किती बिकट परिस्थिती वर मात करत करत काकांनी इथपर्यंत मजल मारली? कधी काँग्रेस मध्ये, तर कधी पुलोद आघाडी!कधी साखर सम्राट,तर कधी क्रिकेट ची सेवा. कधी भाजप ला पाठींबा तर कधी सेनेशी चुम्बा – चुंबी! खरं अष्टपैलू व्यकीत्तव ह्याला म्हणतात!
तर थोडक्यात काय पुरोगामी काका काहीही करू शकतात! पण तुम्हला ट्विट करण्याचा अधिकार कोणी दिला?आणि तेही रिहाना आणि मिया खलीफानी ट्विट केल्या नंतर? खरं म्हणजे, सचिन च्या प्रतिमेजी केरळ काँग्रेसच्या कार्यकर्तांनी,किंव्हा शिरिष काटेकरची सेनेच्या कार्यकर्तांनी पंढरपूर मधे केली,ती काका सहज करु शकतात! तेंव्हा येतात का फड़णीनसांचे कार्यकर्ते ते बघूया!
पण अजूनही वेळ गेलेली नाही! ह्यांतलं काहीही होऊ नये वाटत असेल तर सगळ्या देशभक्त ग्यांग नि काकांची माफी मागावी. ते रहीमदिल आहेत! मोदीजीं सारखे fascist नाहीत. ते लगेच माफ करतील! फक्त ते माफीनाम्याबरोबर कुठला ७/१२ जोडायचा तेवढं ठरवून ठेवा!