चीनचा जगातील सर्व राष्ट्रांना “गळफास”

दुर्मिळ पृथ्वी खनिज्याच्या निर्यातबंदीच्या सहाय्याने

चीन हा विस्तारवादी देश आहे. दुसऱ्या राष्ट्रांचे साम्राज्य गिळकृत करण्याच्या संधीचीच तो वाट पाहत असतो. पण हा विस्तारवाद युद्ध करून तो साध्य करत नाही तर आर्थिक दृष्ट्या राष्ट्रांना कमकुवत करून साध्य  करतो, व त्यासाठी तो नवीन नवीन युक्त्यांचा उपयोग करतो. नदी चा प्रवाह रोकून पाण्याची कमतरता निर्माण करणे, लहान राष्ट्रांना कर्जबाजारी करून त्यांची जमीन हडपणे, इत्यादी. आता एक नवीनच क्लुप्ती त्यांनी योजली आहे ती आपण जाणून घेऊ. ह्याची तयारी चीन बऱ्याच वर्षा पासून करत आहे पण आता त्याची अंमबल बजावणी करावयास सुरुवाती केली आहे. ही युक्ती बऱ्याच लोकांना ज्ञात नाही आहे. अत्यंत धुर्तरित्या चीनने दुर्मिळ पृथ्वी खनिज्याच्या उत्पादन  क्षेत्रात बऱ्याच वर्षांपूर्वी पुढाकार घेऊन त्या व्यापार क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्तापीत केले. ही दुर्मिळ पृथ्वी खनिजे आहेत तरी काय? आपल्या आवर्तसारणी (periodic टेबल)

Rare Earth Periodic Tableमधे 17 रासायनिक घटक म्हणून ह्यांचा समावेश आहे आणि हे छोट्या मोट्या प्रमाणांत एकाच धातूंच्या साठ्यात सापडतात.

 

ह्या खनिजांची नावे  माहीत असणे तीतके महत्वाचे  नाही पण ती नावे खIलील प्रमाणे आहेत. Cerium (Ce), Dysprosium (Dy), Erbium (Er), Europium (Eu), Gadolinium (Gd), Holmium (Ho), Lanthanum (La), Lutetium (Lu), Neodymium (Nd), Praseodymium (Pr), Promethium (Pm), Samarium (Sm), Scandium (Sc), Terbium (Tb), Thulium (Tm), Ytterbium (Yb), and Yttrium (Y).  ह्या खनिजांना दुर्मिळ म्हंटल्या जाते पण पृथ्वीवर त्याचा साठा तेव्हढा दुर्मिळ नाही पण खाणीतून उत्खननाची क्रिया किचकट आहे म्हणून उपलब्धी दुर्मिळ आहे. ह्यातील एक घटक प्रोमेथीयम किरणोत्सर्गी आहे.  ही दुर्मिळ खनिजे मिळवण्याची जी कृती आहे ती अतिशय किचकट आहे व काही देशातच त्याचे उत्खनन होते.  ह्या दुर्मिळ खनिजांचे महत्व इतके का? हा प्रश्न सर्वानाच पडला असेल ही खनिजे विविध क्षेत्रात अगदी छोट्या प्रमाणात वापरली जातात. परंतु त्याच्या काही अदभुत गुणधर्मा मुळे त्यांचे महत्व फार आहे. त्यांच्यातील चुंबकीय शक्ती, उष्णरोधक गुणधर्म आणि झगमगाट देण्याचा गुणधर्मI मुळे त्याचे महत्व आधिक आहे.

सगणंक, इलेक्ट्रॉनिक साहित्य, आरोग्यसेवा उपकरणे, अंतरिक्ष तंत्रज्ञानाला लागणारी उपकरणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संरक्षण खात्याला लागणारी उपकरणे  ह्या उत्पादनात ह्या खनिजांचा उपयोग होतो. दूरदर्शन संच, झगमगाट करणारे दिवे, औषधी, अंतरिक्ष यानाचे घटक, जेट इंजिन चे टरबाईन, ड्रोन, व रडार अशा  अनेक उपकरणाच्या उत्पादनात ह्या खनिजांची आवश्यकता असते. थोडक्यात काय तर ह्या खनिजांची  गरज जगातील सर्वच देशांना भासते. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू ते अंतरिक्ष उपकरणांच्यासाठी ही खनिजे उपयुक्त ठरतात. ही खनिजे कुठे आढळतात? ह्याचा साठा कुठे जास्त आहे? हे जर पाहिले तर असे लक्षात येईल की जगभरच ही खनिजे थोड्या फार प्रमाणात उपलब्ध आहे पण त्याचे उत्खनन आणि शुद्धीकरण फारच जिकिरीचे काम आहे.

दुर्मिळ पृथ्वी तंत्रज्ञान युती  ह्या संस्थेच्या म्हणण्या नुसार जगभर जवळ जवळ एका वर्षात 100000 टन इतके ह्या खनिजांचे उत्पादन होते आणि ह्याची किंमत जवळजवळ 10 ते 15 बिलियन डॉलर इतकी आहे. मग चीन ह्या एकाच देशाने ह्या उत्पादनात वर्चस्व कसे? व का? आणि केव्हा  प्रस्तापित केले ?  ह्या दुर्मिळ खनिजांचे उत्खनन केल्यावर त्यांना वेगळे करण्याची प्रक्रिया ही अतिशय क्लिष्ट व महागडी व श्रमगहन आहे. सर्व प्रथम कच्या मालाला जमा करणे, नंतर त्याला अनेक द्रव्यांमधे मिसळून, व त्यानंतर चाळुन वेगळे करावे लागते. कधी कधी तर ह्या प्रक्रियेसाठी  आम्ल व किरणोतसवी द्रव्याचा नाईलाजाने  उपयोग करावा लागतो. ह्या प्रक्रियेतून जे टाकाऊ पदार्थ तयार होतात ते फार मोठया प्रमाणात असतात व ते धरणे व reservoir जवळ टाकावी लागतात.  ती कधी कधी पाण्यालाही दूषित करतात. ज्या देशात पर्यावरणाला महत्व दिले जाते व पर्यावरणाचे नियम पाळल्या जातात  तिथे ह्या खनिजांचे  उत्खनन करणे  कठीण जाते म्हणूनच पर्यावरणाच्या नियमांना धुडकIरून चीन ह्या खनिजांचे उत्खनन करते. चीन  ह्या खनिजां चे 80 -90 % उत्पादन करते, आणि म्हणूनच ह्या व्यवसायात वर त्यांची घट्ट पकड आहे जवळजवळ सर्व विकसित देशांना चीन ह्या खनिजांची निर्यात करते.

कोणत्याही देशाला जर तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करायची असेल तर त्यांना ह्या खनिज्याची आयात करावीच लागते. इथेच चीन आल्या संधीचा  उपयोग करून खनिज निर्यात थांबवण्याची धमकी देऊन अनेक देशांना आपल्या पुढे झुकायला भाग पाडतो. चीनने ह्या खनिजांचे महत्त्व फार वर्षांपूर्वीच जाणले व 1950 पासून खाणकाम सुरू केले व 1970 पासून त्याचे प्रमाण कित्येक पटीने वाढवले. सैनिक उपकरणांसाठी असणाऱ्या उपयोगामुळे ह्या खनिजांच्या निर्यातीला सांमरीक महत्त्व प्राप्त झाले. 2010 पासून चीनने अमेरिका, युरोपिअन युनियन व जपान च्या निर्यातीत कटौती केली आणि 2020 मधे तर निर्यात थांबवायची धमकीच दिली. ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका ह्या देशांनी आशिया, आफ्रिका, व लॅटिन अमेरिकेतील लहान लहान देशांच्या मदतीने ह्या खनिज्याचे उत्खनन व उत्पादन वाढविण्याचा  बेत आखला आहे. जेणेकरून चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही. अमेरिकेने तर आपल्या लष्करी अर्थ संकल्पातून ह्या कार्यासाठी पैसा उपलब्ध करून दिला आहे, कIरण ह्या खनिजांचा उपयोग लष्करी उपकरणांच्या उत्पादनात होतो

तर अशा प्रकारे दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा उपयोग करून चीनच्या ड्रॅगन ने आपला  विळखा जगातील सर्व देशांवर अधिकच घट्ट केला आहे. दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीचा उपयोग विस्तारवादाचे आपले  स्वप्नपूर्ण करण्यासाठी चीन आता करत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया,  जपान व भारत ह्या देशांना आता चीन च्या ह्या कटाची पूर्ण कल्पना आली आहे म्हणूनच हे सर्व देश एकत्र येऊन  दुर्मिळ खनिजांचे उत्खनन व उत्पादन करण्यास सुरुवात करत आहेत. जेणेकरून चीनच्या ह्या विळख्यातून स्वतः च्या देशाला

सोडवून घेण्यात ते  यशस्वी होतील.

QUAD (quadrilateral security dialogue) ह्याचे महत्त्व आता वाढले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आणि जपान एकत्र येऊन चीनचे वर्चस्व बऱ्याच क्षेत्रात कमी करू पाहत आहे. चीनचा  QUAD ला म्हणूनच विरोध आहे. दुर्मिळ खनिजांच्या तुटवड्याबद्दल पण हे देश चर्चा करत आहेत व उपाय शोधत आहेत चीनची दुर्मिळ खनिजांच्या व्यापरावरील पकड त्यांना सैल करायची  आहे.

ह्या चार देशांच्या वरिष्ठ नेत्याची म्हणजे  पंतप्रधान आणि  राष्ट्रांध्यक्ष  ह्याची एक बैठक 12 मार्च ला झाली त्यात हिंद व प्रशांत महासागर परिसरात शांतता प्रस्थापित करणे, कॉविड -19 वर मात करण्याचे उपाय योजणे, देशांचे सामायिक हित, प्रादेशिक व जागतिक मुद्दे ह्यावर चर्चा झाली. सर्वात महत्वाचा मुद्दा   म्हणजे   QUAD च्या माध्यमातून अति महत्वाच्या तंत्रज्ञाना साठी चीनवर कमीकमी अवलंबून राहाणे कसे साध्य होईल.  QUAD च्या छत्रा खाली एकत्र येऊन दुर्मिळ खनिजांची कमतरता कशी कमी करता येईल ह्या गंभीर प्रश्नाचे उत्तर ह्या देशांना नक्कीच सापडेल ही आशा करू या.

,

AVM Suryakant Chafekar

Air Vice-Marshal Suryakant Chintaman Chafekar, AVSM, Sharuya, Shaurya Chakra is a retired Indian Air Force (IAF)officer. He was the Commander Officer of No 48 Squadron IAF. In May 2008, he landed Antonov AN-32 aircraft on High Altitude Advanced Landing Grounds Daulat Beg Oldie, Fukche, and Nyoma.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *