आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारा खरा गुन्हेगार :अलेक्झांडर डफ

एकटे लॉर्ड मेकॉले ह्याला जबाबदार नाहीत!

आम्ही असंख्य वेळा ऐकले आहे की या लॉर्ड मेकॉले आपली शिक्षण प्रणाली कशी खराब केली; परंतु त्याच्यापेक्षा  

अधिक धोकादायक अलेक्झांडर डफ बद्दल आपल्याला माहिती आहे? अक्षरशः, हा ख्रिश्चन मिशनरी एकटा बंगाल आणि बिहारच्या विशिष्ट भागातील शिक्षण व्यवस्थेच्या ऱ्हासासाठी  पूर्णपणे जबाबदार होता! स्कॉटलंडमध्ये एप्रिल १८०६ मध्ये जन्मलेला चर्च ऑफ स्कॉटलंड चा हा अनुयायी, पहिला मिशनरी म्हणून १८३० मध्ये  कलकत्याच्या  किनाऱ्यावर पोहोचला.

त्यांनी इंग्रजी शिक्षणाचे आमिष दाखवून सर्वप्रथम, धर्म परिवर्तन करण्यासाठी उच्च जातीचे हिंदू व मुस्लिम यांना लक्ष्य केले.

तोपर्यंत सगळे मिशनरी हे खालच्या वर्गाला परावर्तित करण्याच्या योजना बनवत असत, आणि त्यांच्या शाळांमध्ये शिकवताना बंगाली भाषेला कधीही स्पर्श केला नाही. डफ यांनि समाजातील काही घटकांना केवळ इंग्रजी आणि इंग्रजीमध्ये शिक्षण देण्याच्या सूचना जारी करेपर्यंत, त्याना  बंगाली भाषेतच शिक्षण दिले जात असे. हिंदू आणि मुस्लिमांना हळू हळू ख्रिस्ती धर्मात रूपांतरीत करण्यासाठी पाश्चिमात्य शिक्षण पद्धती वापरण्याचे धोरण डफने आखले!

त्याच्या ह्या यशस्वी कार्यकर्माचे खालील परिणाम झाले : 

१) शिक्षणाच्या बाबतीत भारत सरकारच्या धोरणात बदल करणे.

२) शिक्षणाला, ख्रिश्चन चर्चद्वारे मिशनरी मध्यस्थ(एजन्सी) म्हणून मायदेशी मान्यता मिळवणे.

३) उच्च-जातीय हिंदूंच्या मनात ख्रिश्चन विचारांना मिळवून देणे. 

अलेक्झांडर डफ यांनी “डाउनवर्ड फिल्टरेशन थियरी” नावाचा सिद्धांत प्रस्तावित केला, ज्यात त्यांनी असा विश्वास दर्शवला होता की मध्यम आणि उच्च सामाजिक वर्गापर्यंत पोहोचता आले तर, ख्रिश्चन धर्माचे ज्ञान अखेरीस समाजाच्या तळागाळात पाझरेल (फिल्टर होईल). ७ मार्च १९३५ रोजी, हा ठराव संमत झाला की उच्च शिक्षणात भारतातील ब्रिटिश सरकारचे उद्दीष्ट हे मूळ भारतीयांमधे युरोपियन विज्ञान आणि साहित्यास प्रोत्साहन दिले जावे आणि शिक्षणाच्या उद्देशाने विनियोजित सर्व निधी उत्तमरित्या फक्त इंग्रजी शिक्षणावर उपयोगात आणले जावेत. 

१८३४ in मध्ये डफ इंग्लंडला परत गेला. १८४० मध्ये तो चर्च ऑफ इंग्लंड आणि चर्च ऑफ स्कॉटलंडच्या मोठ्या संस्थांकडून केवळ बायबल संबंधी अभ्यास आणि धर्मांतरण या उद्देशाने प्रचंड निधी घेऊन परत आला. १८४३ मध्ये, जेव्हा त्याने चर्च ऑफ स्कॉटलंड बरोबर मतभेद झाल्याने फारकत घेतली, तेव्हा डफने आपला धर्मांतराचा कार्यक्रम निर्दयतेने सुरू ठेवण्यासाठी फ्री चर्चची स्थापना केली. 1857 मध्ये त्यांने कलकत्ता विद्यापीठ स्थापन केले.

१८४४ मध्ये त्यांनी गव्हर्नर जनरल विस्कॉउंट हार्डिंगची सहमती प्राप्त केली की जो कोणी त्याच्या संस्थांमध्ये शिकतो तो सरकारी नोकरीस पात्र आहे.

ख्रिस्ती धर्माकडे वळलेले सर्वात कुख्यात बंगाली 

त्याच्या काळात, कित्येक प्रभावि आणि मान्यता प्राप्त बंगालीं लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला; जसे की रेव्हरंड लाल बिहारी डे आणि कृष्णा मोहन बॅनर्जी

                                             

         लाल बिहारी डे                                                                         कृष्णा मोहन बॅनर्जी

1849 मध्ये डफ इंग्लंडला परत गेला. नंतर तो अमेरिकेला गेला, परंतु 1856 मध्ये तो परत भारतात आला. 1857 च्या भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामुळे डफला कलकत्ता विद्यापीठात मुक्काम करावा लागला. शेवटी, आणखी क्षीण होत चालेल्या आरोग्याच्या मुळे डफला भारत कायमचा सोडावा लागला. 

अलेक्झांडर डफ 12 फेब्रुवारी 1878 रोजी डेव्हॉन येथे मरण पावला.

बंगाल बाहेर अलेक्झांडर डफचे काम

एकदा कलकत्त्यात चांगला जम बसल्यानंतर डफ, सिलोन पर्यंत गेला आणि असंख्य शिक्षण संस्थाना ख्रिश्चन धार्मिक कॉन्व्हेंट मध्ये परावर्तित केले. 

१८३२ मध्ये स्कॉटलंड चर्चने आणखी एक मिशनरी जॉन विल्सन यांना मुंबई येथे पाठवले ज्याने डफच्या धर्मांतरणाच्या पद्धतींची नक्कल करायला सुरुवात केली. 

राजा राम मोहन रॉय हे एक स्वाभिमानी हिंदू असल्याचे सांगणारे बंगाली लोकना मला हे सांगायचं, कि  राजा राम मोहन रॉय यांनी “हिंदू अज्ञान” समजल्या जाणाऱ्या समजुती काढून टाकण्यासाठी डफच्या पद्धतीला मान्यता दिली होती. एका धर्माच्या शिक्षणा ऐवजी दुसऱ्या धार्मिक शिक्षणाने अज्ञान कसे काय दूर केले जाऊ शकते? ते कोणाला काहीही सांगत असू दे, पण  सत्य हेच आहे ख्रिश्चनांचा विज्ञानावर विश्वास नाही.

हे अगदी उघड आहे की डफचे उद्दीष्ट संपूर्ण भारतभर ब्रिटीश राजवटीत मदत करण्यासाठी आज्ञाधारक ख्रिश्चन सैनिक बनविणे हेच होते.

This article was is originally written by Shesha Patangi and published by Missionkali.org. The link to the same is given here :

Alexander Duff: The real culprit who ruined our education system

Leave a Reply

Your email address will not be published.