आषाढी एकादशी निमित्त – अभंग
गुंजन नामाचे ऐसे की कोंदले
मन आनंदले भक्तिभावे।।समभंग पदी ऐसा जगजेठी
हात ठेऊनि कटी संतुलित।।
भावनांचा कल्लोळ षड्रिपूंचा कोळ
आणि ब्रह्मघोळ दर्शने निमाला।।
विसावले मन तया चरणी लीन
स्थिरचित्त मति एकवटे।।
आनंदाचा कंद परिमळ मंद
तयाचाच छंद रात्रंदिन ।।
रमा म्हणे ऐसी उजळली दीठ
हृदयीची वीट आसने दिली।।
रमा गोळवलकर