कारगिल हवाई युद्ध

कारगिल युद्ध हे वायुसेनेच्या दृष्टीने बरेच वेगळें व नाविण्यपूर्णे हवाई युद्ध होत. ह्याचे  मुख्य कारण असे की वायुसेनेला त्याच्या कारकिर्दीत प्रथमच पर्वतीय प्रदेशात युद्ध करावे लागले. लष्करIसाठी जसे अश्या प्रदेशात  हल्ला करणे कठीण असते तसेच वायुसेनेसाठी पण ते एक मोठे आव्हान असते. ‘ऑपरेशन सफेदसागर’ हे वायुसेनेच्या कारगिल ऑपरेशनचे नाव होते. वायुसेनेच्या इतिहासातील ही एक प्रगती दर्शक घटना होती असे म्हणता येईल. पर्वतीय प्रदेशात हवाई हमला का कठीण असतो ते बघुया. 

पर्वतीय क्षेत्रात हवाई हमला करताना विमान आणि क्षेपणास्त्रच नव्हे तर सर्वच शस्त्रात्रांची कामगिरी खालावते, ह्याचे प्रमुख कारण म्हणजे विमानांना बऱ्याच उंचीवरून हमला करावा लागतो. समुद्र सपाटीहुन अधिक उंचीवर हवा वीरळ  असल्याने विमानाच्या इंजिनाची क्षमता कमी होते. थोडक्यात काय तर इंजिनाची राखीव ऊर्जा कमी होते शिवाय विरळ हवे मूळे विमानावार ताबा ठेवणे सुद्धा जरI जडच जाते, व शस्त्रात्रांचा  अचूक प्रहार करणे कठीण काम असते . शिवाय बॉम्बची घातकता व अचूकता ही कमी पडते.  सपाट प्रदेशात जमिनीवरील लक्ष्य नेस्तनाबूत करणे सोपे असते पण पहाडी प्रदेशात अचूक प्रहार झाला नाही तर  टार्गेट नेस्तनाबूत होत नाहीत. समुद्रासपIटीवर शस्त्रांची जी घातकता असते ती अधिक  उंचीवरून मारा करताना कमी होत जाते. कारगिल युद्धIत सगळे टार्गेट साधारण 14000 ते 15000 फुटावर पहाडात होते. वायुसेनेला अचानक बदलणारे हवामान, कमी दृश्यातI, ताशी  130 किलोमीटर / तास वेगाने वाहणारे वारे ह्या सर्व आव्हानांचा सामना करत शत्रू वर  आक्रमण करावे लागले.

 वायुसेनेला युद्धासाठी तय्यार रहावयास सांगण्यात आले ती तारीख होती  11 मे 1999 आणि सर्वप्रथम फक्त हेलिकॉप्टर्सना उपयोगात  आणण्याचीच परवानगी होती.  पण प्रत्येक्ष हमला करण्याची परवागी 25 मे रोजी सरकारने दिली. पण ही परवानगी एक अट लादून देण्यात आली आणि ही अट म्हणजे भारत-पाक सीमारेषा भारतीय विमानांनी ओलांडायांची नाही. वायू सेनेला अशा अटीसहित आक्रमण करणे फारच कठीण होते. वायुसेनेनी सरकारला लढाऊ विमानाचा उपयोग करण्याची परवानगी मागितली पण ती सुद्धा अटी सहिततच देण्यात आली. आपण हवाई हल्ल्यात एक लढाऊ विमान व एक हेलिकॉप्टर गमावल्यानंतर हेलिकॉप्टरनी हमले बंद  करण्यात आले. आपली लढाऊ हेलिकॉप्टर MI-25 आणि MI 35 ह्या प्रदेशात उपयोगात आणता येत नव्हती. सशस्त्र MI  17 नि 26 मे ला टोलोलिंग ला चांगली कामगिरी बजावली  पण नतर इतकी यशस्वी  ठरली नाहीत.  लढाऊ विमाने विविध भूमिकान मधे वापरली गेलीत हवाई परीक्षण , हवाई हमले, व लढाई नुकसान मूल्यमापन अश्या त्या भूमिका होत्या. वायुसेनेच्या हमल्यात शत्रूचे लॉजिस्टिक सप्लाय साखळी चे नुकसान झाले व भारतीय हवाई हमल्यात ते आपल्या जखमी सैनिकांना पण सुरक्षित जागी हलवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा कणाच मोडला व त्यांचे मनोधैर्य खच्ची झाले. पर्वतीय  प्रदेशात मीग विमानांची कामगिरी तितकी चांगली नव्हती म्हणून मिराज विमानांचा हमल्यासाठी वापर करण्यात आला.  750 ते 950 किलोमीटर प्रति तास गतीने पर्वतमय प्रदेशात अचूक हमला करणे एक दिव्यच आहे.  

भारतीय  लष्कराच्या  हल्ल्या  अगोदर वायुसेनेच्या विमानांनी पहाडावर लपलेल्या शत्रूवर व त्यांच्या शस्त्रास्त्रे, अन्न धान्य समुग्रीवर हल्ला चढवायचा व मग मनोधैर्य गमावलेल्या शत्रूवर भरातीय लष्कराने तुटून पडायचे असा डावपेच भारताने आखला होता व तो यशस्वी पण झाला. ह्या युद्ध 1367 जखमी झाले, 527 अधीकारी व सैनिकांना वीरगती प्राप्त झाली.

टायगर हिलचा हमला प्रामुख्याने जाणून घेण्यासारखा आहे. लष्कराला टायगर  हिल वर हमला करणे कठीण जात होते कारण पहाडावर उंचावर असलेला शत्रू त्यांच्यावर अचूक हमला करत होता. म्हणूनच मिराज विमानांनी टायगर हिल वर लेसर गाईडेड शेपणास्त्रांनी हमला केला व अनेक सैनिकांन बरोबर शत्रूची पुरवठा साखळी नेस्तनाबूत केली. त्यानंतर भारतीय लष्कर शत्रूवर चालून गेले व टायगर हिल आपल्या कब्जात आली. टायगर हिलच्या पराभवानंतर भारताच्या  विजयाचा मार्ग सोपा झाला.

 भारतीय लष्कर व वायुसेना मधील ताळमेळ अतिशय उत्तम होता त्यामुळेच दोघांनी मिळून केलेले आक्रमण यशस्वी झाले. द्रास सेक्टर मध्ये पॉईंट 4388 वर पण एक असाच हमला यशस्वी ठरला. इथे वायुसेनेच्या  हवाई हमला सुरू झाल्यावर पाकिस्तानी सैनिकांनी त्यांचा पुरवठा  मार्गच बदलला पण वायूसेनेच्या टेहळणी करणाऱ्या विमानांनी तो मार्गही शोधून काढला व मिळालेल्या माहितीच्या आधारे मिराज विमानांनी हवाई हल्लI करून पाकिस्तानी लष्कराची जेरेबंदीच केली.  मुंथो  धालोलI  अशाच एका पुरवठा शिबिरावार केलेल्या हल्ल्याने पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले व त्यामुळं हतबल झालेल्या सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवून  हार मानली. भारतीय अधीकारी व जवानांनी खूप पराक्रम गाजवला. युद्धानंतर ह्या कामगिरी साठी  4 परमवीर चक्र, 11 महावीर चक्र व 55 वीर चक्र देऊन अनेक वीरांचा सन्मान करण्यात आला. 

सफेदसागर ऑपरेशन्स मूळे कारगिल युद्धानंतर भारतीय वायुसेनेला बरेच काही शिकावयास मिळाले; पर्वतमय  प्रदेशातील युद्धात लष्कराच्या आक्रमणIआधी वायुसेनेचे हल्ले फार महत्वाचे ठरतात. शत्रूचा पुरवठा साठा  शस्त्रसाठा नेस्तनाबूत केल्यास शत्रू चे मनोधैर्यच खचते व मग थलसेनेचI हल्ला यशस्वी होतो.  पहाडी क्षेत्रात हवाइहल्ला हा अचूक हवाच नाहीतर लक्ष्याचा संपूर्ण नायनाट करणे कठीण होते. अचूक हवाई हल्ल्यासाठी अचूक मIरI करणारे क्षेपणास्त्रे हवे कारण  पर्वतीय क्षेत्रात नेमबाजी कठीण असते. 

 ह्या युद्धात वायुसेनेने रात्री पण हवाई हल्ल्यात बरेच यश मिळवले.  वायुसेनेने अनेक नवीन युक्त्या अवलंबून, शेपणास्त्रांचा कल्पकता  वापरून चातुर्याने उपयोग केला व त्यात त्यांना भरघोष  यश पण मीळाले. विचारांची लवचिकता असेल व चांगल्या कल्पक विचारशक्तीची साथ असेल तर कार्यसिद्दी सोपी होते. हवाई  शक्तीचा प्रभावी उपयोग केला तर युद्धात मनुष्य हानी टाळता येतेच शिवाय लष्कराला कमी वेळात यश मिळवणे साध्य  होते. मर्यादित युद्धात वायुसेनेचा उपयोग केला तर युद्ध अधीक चिंघळते व त्याचा अधीक विस्तार होतो असे म्हंटले जाते. परंतु ह्या मर्यादित युद्धात आपण वायुसेनेचा मर्यादित प्रमाणात उत्तम उपयोग करू घेतला व पुढेही करु शकू हे सिद्ध केले. ऑपरेशन सफेदसागर म्हणूनच भारताच्या लष्करी उडडयन क्षेत्रातील एक  निर्णIयक टप्पा आहे असे म्हणता येईल. 

AVM Suryakant Chafekar

Air Vice-Marshal Suryakant Chintaman Chafekar, AVSM, Sharuya, Shaurya Chakra is a retired Indian Air Force (IAF)officer. He was the Commander Officer of No 48 Squadron IAF. In May 2008, he landed Antonov AN-32 aircraft on High Altitude Advanced Landing Grounds Daulat Beg Oldie, Fukche, and Nyoma.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *