सर्व वाचकांना जन्माष्टमीच्या शुभेछा

उधळीत चौफेर स्मित रंग
असे शुभ्र वासरांत उभा
सावळा मुरारी
घालून अलगद फुंकर
रूसव्यावर
जणू किमयाच करी राधेवरी
भासे मज चंद्रमा ही असा
जसा काळ्या मेघांच्या
निरंजनात
लखलखे शुभ्र वात
होतात मग फिके सारे रंग ही
सात
होताच अवधी काळ्या
नभांतून
शुभ्र धवल बरसात
लोभनीय तो डौल
शुभ्र राजहंसाचा
आणि कर्ण मधुर तो स्वर
सावळ्या कोकिळेचा
नयन मनोहर मिलाप हा
सावळ्या धवल रंगाचा की हा खेळ ऊन सावलीचा
Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *