सागरा प्राण तळमळला
नाशिकपासून २२किलोमीटरवर भागूर येथे पेशव्यानीं बहाल केलेल्या जहागिरीचे सर्वेसर्वा दामोदर सावरकर यांच्या कुटुंबात २८ मे १८८३ रोजी पुत्ररत्न जन्मास आले. ज्याचे नाव “विनायक” अर्थात विनायक सावरकर ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर असे ओळखतो. लहानपणापासून जगाच्या इतिहासाविषयी प्रचंड वाचन, वयाच्या आठव्या वर्षीपासून कविता लिखाण, पोवाडे, वर्तमानात लेखन ह्या गोष्टी आणि त्यावेळचा सामाजिक आणि राजकीय रित्या पारतंत्र्यात अडकलेला भारत देश, ह्यामुळे सावरकरांचे व्यक्तिमत्व हळूहळू क्रांतिकारक बनले. त्यांचे विचार त्यांच्या कवितांमधून झळकत.
“रणाविन स्वातंत्र्य कोणाला मिळाले?” ही त्यांची कविता खूप गाजली .
“मित्रमेळा” नावाने ब्रिटिशांविरुद्ध गुप्त बैठकी होऊ लागल्या. नंतर हिंदू महासभेची स्थापना आणि त्यानंतर उर्वरित आयुष्य स्वातंत्र्यसाठीचा प्रवास.
पोर्टब्लेअर येथे कारावसाची शिक्षा भोगत असताना सावरकर लिहितात, “आज जरी पारतंत्र्यात असलेला भारत दिसत असला तरी एक दिवस तोच भारत नंदनवन बनलेला दिसेल. आज मला खूप आनंद होतोय की हा भारताचा प्रश्न एक आंतरराष्ट्रीय भूकंप बनला आहे.”
“मी जेव्हा जेव्हा माझ्या खोलीच्या एकटेपणात कोलू फिरवतो आणि परिश्रमाने थकतो , तेव्हा स्वतःला ह्या विचाराने दिलासा देतो की मी हे सहन करीन कारण मी कोलूचं प्रत्येक चाक जेव्हा ताकदीनिशी फिरवतो त्यावेळी जी ठिणगी पेटते आणि तेलाचा थेंब निघतो तो बाहेरच्या जगातील माझ्या लोकांच्या मनातील असंतोषाच्या ज्वाळा प्रज्वलित करतील.”
सावरकर एकमात्र व्यक्ती होते जे फक्त ब्रिटिशांपासून हिंदुस्थान स्वतंत्र हवे हे बोलत नव्हते तर “हिंदुत्व” म्हणजे काय ह्याचा भौगोलिक अर्थ स्पष्ट करून सांगत होते.
“आसिन्धु सिन्धु पर्यन्ता यस्य भारत भूमिका: ।
पितृभूः पुण्यभूश्चैव, स वै हिन्दू रिती स्मृतः ।।”
(अर्थात):- “हिमालय से लेकर समुद्र पर्यन्त फैले हुए सम्पूर्ण #भारत भूमि को जो अपनी ‘पितृभूमि और पुण्यभूमि’ मानता है, वह #हिंदू है.!”
तुरुंगातील भिंती आपल्या कवितांनी पावन करणाऱ्या अशा स्वातंत्र्य वीराला आजच्या दिवशी शतशः नमन!
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा…