रंगबिरंगी अंतरंगाच्या छटा

According to the stages of life and situations, our mood changes and eventually the colour of emotions…

रंगांची उधळण आसमंतात झालीय…दाटलेले काळे मेघ, पाऊस पडून गेल्यावर निळेशार दुलई पांघरलेले आकाश…आणि नुकत्याच पावसानंतर ऊन पडून साकारलेलं इंद्रधनुष्य…सात रंगांची कमान…

एकाच पांढराशुभ्र रंगापासून प्रकटलेले विविध मनोहर रंग…

असेच एकाच निर्मळ शुभ्र रंगापासून प्रकटलेले विविध मनोहर रंग आपल्या प्रत्येकात सामावलेले आहेत. नाही ना आकलन होत? 

जरा आपल्या अंतर्मनाचा कवडसा बाजूला सारून आत डोकावून पहा…आहेत ना Different shades of colour? आपल्यात दडलीये नुकत्याच जन्मलेल्या  बाळाची गुलाबी निरागसता, तर कुठे गुलबक्षी रंगाचं कोमल हळवं मन,  मनाच्या आतल्या कप्प्यात पहाल तर जगण्याचा आनंद लुटण्यासाठी आसुसलेलं तरूण हिरवं मन. रंग उमलत्या मनाचे जसे…

पुढचा खण उघडला तर दिसते आहे एक चंदेरी पोषाखातील राजकन्या आपल्याच दिमाखात, ऐटीत मिरवणारी…मनाच्या दुसऱ्या दालनात 

बसलीये सोनेरी रंगाची परी…स्वप्नं उराशी घेऊन बागडणारी…आतल्या चोरकपप्यात लपलीये लाल बाहुली…आठवण म्हणून जपलेली…फिकी झालेली…रंग उडालेली…जुन्या परकर पोलक्यात लपेटलेली…काळाच्या पडद्याआड गेलेली…तरी  आठवणीनी अजूनही टवटवीत…

मनाच्या माजघरात बसलीय एकाकी, गंभीर, प्रौढ, अतोनात कष्ट उपसणारी…हसरी मुद्रा आणि प्रसन्न भाव जपणारी पिवळीशार अन्नपूर्णा…

पोरकट, अल्लड अशी या घरात आलेली आणि घराचं परसदार फुलवणारी…तिची माया जशी प्राजक्ताच्या पांढरया केशरी फुलांचा सडा…

तर अडगळीच्या खोलीत कटू अनुभव पचवलेली, फसलेली, हरलेली, आंसू थिजलेली, पसरलेल्या काजळाने काळवंडलेली राखाडी “ती”…

बुजलेली, संकोचलेली, ओघळणाऱ्या जखमांना चंदनाचा लेप लावणारी मोरपिशी रंगांची आणि तेवढीच मुलायम सखी…किंवा मन जपणारा सखा…

From Purnima to Amavasya phases, size of moon 🌖 are also changing…its brightness (colour) changes…I find it similar to our stages of life. When we are Happy, our face glows brightly like the full moon day on Purnima…Let’s enjoy all these Shades of the Inner Mind with Happiness 😊

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *