डोन्ट स्टाॅप ड्रिमींग जस्ट बिकाॅज यू हॅड अ नाइटमेअर

नाइटमेअर अर्थात एक दुःस्वप्न ! पण हे झोपेत बघितलेलं नक्कीच नव्हतं. हे एक अनुभवलेलं कटू वास्तव होतं.
संपूर्ण जगावर एक अनामिक भीतीचं सावट पसरलेलं होतं.डाॅक्टर , शास्त्रज्ञ चोवीस तास रिसर्च करत होते. आज आहोत उद्या काय हे भय थरकाप उडवणारे होते.हाॅस्पिटल मध्ये जाताना बरे होणार की नवीन संसर्ग घेऊन येणार ह्याची खात्री नव्हती.तो संसर्ग म्हणजे”कोरोना”नावाच्या वेगाने पसरणाऱ्या विषाणू चा.न भूतो न भविष्यति अनुभवलेली भीती. अशातच
एक दिवस मला भेटायला एक जणआली.तुमच्याबरोबर तुमच्या सारखं काम करायचंय म्हणाली.चर्चा झाली आमची कामासंदर्भात , सुरू कर लगेच मी म्हणाले.सध्या कोरोना काळात टेलीकॉलिंग कर मी सांगितलं WhatsApp वर आदल्या रात्री बोलणं झालं होतं आमचं आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली she is no more….काय? पायाखालची जमीन सरकली…
दुसऱ्या दिवशी माझं अंग तापलं होतं, श्वास घ्यायला त्रास होत होता, O2:level was good, पण something was wrong , admitted in ICU . My test was negative. Every parameter was good. So came happily home after , 2 days . पण पुढे बरंच वाढून ठेवले होते.पुन्हा त्रास सुरू झाला. परत टेस्ट करवून घेतली स्वतःची . I was tested Covid Positive … माझ्या समोर प्रचंड अंधार दाटला होता. स्वतःला होणारा त्रास आणि सभोवतालची परिस्थिती याने खूप नैराश्य येतं होतं.ऍंब्युलन्सचे सदोदित वाजणारे सायरन , पोलिसांच्या घरासमोरून फिरणाऱ्या गाड्या मनोबल खचवत होत्या. चौदा दिवस माझी खोली मला तुरूंगासारखी वाटायची. आजूबाजूला कुठल्या ना कुठल्या घरातून वाईट बातमी यायची. एखाद्या कैद्याला देतात तसं खोलीच्या बाहेर आपलं ठेवलेलं ताट उचलताना डोळ्यांतील अश्रू अन्नात मिसळायचे. अन्न घशाखाली उतरत नव्हतं. रोज रात्री झोपण्यापूर्वी उद्या उठू की नाही ह्या भीतीने रात्री जागवून निघायच्या.जवळची नाती, मैत्रीणी फोन करायचे, msg, करायचे , मूड फ्रेश राहण्यासाठी माझा सुंदर गाणी, भजन, मंत्र, पाठवायचे.पण मी मानसिक रित्या इतकी खचले होते की कशाचाच परिणाम होत नव्हता. मला गाणं म्हणायचं असायचं पण दम इतका लागायचा अर्धी ओळ पण नीट म्हणू शकायची नाही.. मग एक सकाळ प्रबळ इच्छाशक्ती घेऊन उजाडली. Everything will be Alright ! I will fight….And I did it…

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *